Menu Close

दोघा अल्पवयीन धर्मांधांकडून सदरबझार (जिल्हा सातारा) येथील मारुति मंदिरातील मूर्तीची विटंबना !

  • पोलिसांचा धाक नसल्याने आणि हिंदू सहिष्णु असल्याने हिंदूंच्या मंदिरांतील मूर्तींची विटंबना करण्याचे दु:साहस धर्मांधांकडून केले जाते. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

  • बहुसंख्य हिंदूंच्या देशात मूर्तीची विटंबना होणे हे पोलिसांना लज्जास्पद !

श्री मारुतीच्या मूर्तीवर महाअभिषेक करतांना भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर

सातारा– येथील दोघा अल्पवयीन धर्मांधांनी २६ ऑक्टोबरला रात्री ८.३० वाजता सदरबझार येथील मारुति मंदिरात घुसून मूर्तीची विटंबना केली. दुसर्‍या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे भाविक मंदिरात दर्शनासाठी गेले असता मूर्तीची विटंबना केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्हीची पडताळणी केली असता हा प्रकार २ धर्मांधांनी केला असल्याचे उघड झाले. या प्रकरणी सदरबझार पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून पोलिसांनी दोघा अल्पवयीन धर्मांधांना कह्यात घेतले आहे. या घटनेनंतर सदरबझार परिसरात तणावाचे वातावरण होते. येथे दिवसभर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवून सदरबझार परिसर बंद ठेवण्यात आला होता. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी हिंदु आणि मुसलमान समाजातील प्रमुखांशी चर्चा करून शांतता राखण्याचे आवाहन केले.

महाआरतीसाठी श्री मारुति मंदिरामध्ये जमलेले धर्माभिमानी हिंदू

धर्माभिमानी हिंदूंनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. २७ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी हिंदुत्वनिष्ठांनी संघटित होऊन श्री मारुतीच्या मूर्तीवर महाअभिषेक केला. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

धर्मांधांच्या कुरापती नित्याच्याच !

सदरबझारच्या जवळच अवैध पशूवधगृह आहे. त्यामुळे तेथील हिंदूंना नेहमीच धर्मांधांच्या विविध कुरापतींना सामोरे जावे लागते. गोहत्या, गायींची तस्करी, गोमांस इतरत्र फेकणे, असे प्रकार या परिसरामध्ये कायम घडत असतात. आतातर थेट हिंदूंच्या मंदिरांमध्ये प्रवेश करण्यापर्यंत धर्मांधांची मजल गेली. (असे प्रकार होत असतांना पोलिसांना लक्षात येत नाहीत का ? पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती, तर धर्मांधांचे पुढील अपप्रकार करण्याचे दु:साहस झालेच नसते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *