Menu Close

मुसलमानाकडून नाशिकच्या हिंदु तरुणाचे नोकरीचे प्रलोभन दाखवून धर्मांतर !

फसवून धर्मांतर करणारे मुसलमान ! हिंदूंनो, धर्मांतराचे हे षड्यंत्र रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

नाशिक, ९ सप्टेंबर – कुवेतमध्ये नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून येथील कापड पेठ या भागातील गौरव संधानशिव (वय २८ वर्षे) या तरुणाचे इस्लाममध्ये धर्मांतर करून त्याला डांबून ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी गौरवच्या बहिणीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात सिराज शेख या संशयिताविरुद्ध अपहरणाची तक्रार नोंदवली आहे. हा गुन्हा आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून संशयित सिराज शेख आणि तरुणाच्या शोधासाठी पथक मुंबईकडे गेले आहे.

१. गौरव याने एम्बीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीसाठी मुंबई गाठली होती. मुंबईत रिलायन्स आस्थापनात काम करत असतांना तो परदेशात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील होता.

२. कुवेत येथील आय पॅक इंटरनॅशनल पॅकेजिंग सर्व्हिसिंग या आस्थापनात नोकरीसाठी त्याची निवड झाली होती; मात्र त्याचा व्हिसा रहित झाल्याने तो ताणात होता.

३. या वेळी त्याला सिराज शेख नावाचा मित्र भेटला. त्याने कुवेतमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्‍वासन दिल्याने तो सतत त्याच्या संपर्कात होता.

४. ३ सप्टेंबर या दिवशी त्याला दूरभाष आल्यावर १० मिनिटांसाठी जाऊन येतो, असे आईला सांगून तो घराबाहेर पडल्यावर आजपर्यंत घरी आलेला नाही. त्याच्या भ्रमणभाषवर संपर्क साधला असता तो बंदस्थितीत असलेला आढळतो.

५. गौरवच्या मुंबईतील काही मित्रांचे संपर्क क्रमांक मिळाल्यावर त्यावर संपर्क केल्यावर धर्मांतराची माहिती मिळाली.

६. गौरव गेल्या काही दिवसांपासून मुसलमान समाजाकडे आकर्षित झाला होता. त्याने २ महिन्यांपूर्वी सुंता करून घेतल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर नातेवाइकांनी त्याची घरातील बॅग तपासली असता त्यात मुसलमान समाजाची टोपी आणि वैद्यकीय चाचणीचा अहवाल सापडला.

७. त्यावरून नातेवाइकांकडून सिराज शेखचा शोध चालू झाला. याविषयी गौरवची बहीण वैशाली कापुरे हिने गौरवला नोकरीचे प्रलोभन दाखवून मुसलमान धर्मात धर्मांतर करण्यात येऊन त्याला कोठेतरी लपवून ठेवल्याची तक्रार केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *