हिंसाचाराचे षड्यंत्र रोखण्यासाठी राज्य सरकारकडे असलेली योजना सादर करण्याचा आदेश
एखाद्यावर अन्याय होत असतांना न्यायालयाने त्याची स्वतःहून नोंद घेणे, हे चांगलेच आहे. त्यासह भारतभर धर्मांधांकडून हिंदूंवर होत असलेले अत्याचार, लव्ह जिहाद आदी प्रकरणांचीही न्यायालयाने नोंद घेऊन हिंदूंना न्याय मिळवून द्यावा, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
आगरतळा (त्रिपुरा) – त्रिपुरा राज्यात गेल्या काही दिवसांत अल्पसंख्यांकांच्या संदर्भात झालेल्या हिंसाचाराची त्रिपुरा उच्च न्यायालयाने स्वतःहून नोंद घेत राज्य सरकारकडे अहवाल मागितला आहे. १० नोव्हेंबरपर्यंत याविषयी विस्तृत अहवाल सादर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे.
Tripura High Court takes suo motu cognizance of violence stemming from VHP rally
reports @ShagunSuryam #TripuraRiots #TripuraViolence
Read More: https://t.co/jqFrCSBlhx pic.twitter.com/XonIErAFFY
— Bar & Bench (@barandbench) October 30, 2021
तसेच ‘राज्यातील धार्मिक हिंसाचार भडकावण्याचे षड्यंत्र उधळून लावण्यासाठी राज्य सरकारकडे काय योजना आहे?’, याची माहिती देण्यासही न्यायालयाने सांगितले आहे. (बांगलादेशात हिंदूंवर प्रचंड अत्याचार झालेले असतांना तेथील न्यायालयाने अशा प्रकारे स्वतःहून नोंद घेतल्याचे दिसले नाही, हेही लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) बांगलादेशात हिंदूंवर आक्रमणाच्या निषेधार्थ त्रिपुरामध्ये मोर्चे काढल्यावर मुसलमानांना लक्ष्य करण्यात आले.