Menu Close

कोपरगाव येथील हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे अनधिकृत पशूवधगृहावर कारवाई !

प्रतिकात्मक छायाचित्र

कोपरगाव (जिल्हा नाशिक) – येथील हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे अनधिकृत पशूवधगृहावर प्रशासनाने कारवाई करत ते भुईसपाट केले. शहरात मोठ्या प्रमाणावर या पशूवधगृहात गोवंशियांची कत्तल केली जात असल्याने हिंदुत्वनिष्ठांनी कारवाईची मागणी केली होती. हिंदुत्वनिष्ठांनी संघटितपणे या पशूवधगृहावर कारवाई करण्याविषयी प्रशासनाचा पाठपुरावा केला; पण प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे हिंदुत्वनिष्ठांनी सांगितले. कारवाई होत नसल्याने येथील हिंदुत्वनिष्ठांनी प्रशासनाला ३१ ऑक्टोबरपर्यंत कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाची चेतावणी दिली होती. हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे शेवटी अनधिकृत पशूवधगृहावर प्रशासनाने कारवाई चालू केली. या वेळी प्रशासनातील मोठे अधिकारी उपस्थित होते आणि पोलिसांचा मोठा फौजफाटाही उपस्थित होता.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *