हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर येथे जिल्हा प्रशासनास निवेदन
कोल्हापूर – चीनच्या कपटनीतीमुळे भारत-चीन सीमेवर गेले काही मास तणाव निर्माण झाला आहे. चीनने भारताच्या भूमीत अतिक्रमण केले, तसेच सैन्यावर आक्रमणही केले होते. काही मासांपूर्वी भारताने ‘चिनी ॲप्स’वर बंदी घातली. गेल्या वर्षी भारत सरकारने चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घातली होती. यंदाही चिनी फटाक्यांवरील बंदी कायम रहावी, यासाठी भारत सरकारने जागृती करावी. अवैध मार्गांनी चिनी फटाके भारतात आणले जाऊन त्यांची विक्री होऊ नये, याची दक्षता घ्यावी. जे विक्रेते चिनी फटाक्यांची विक्री करतात, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ ऑक्टोबर या दिवशी कोल्हापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना देण्यात आले. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)
या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेना करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेना शाहूवाडी तालुकाप्रमुख श्री. दत्तात्रय पोवार, शिवसेना उंचगाव विभागप्रमुख श्री. दीपक रेडेकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख श्री. विनायक जाधव, शिरोलीचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. सतीश पाटील, भाजपचे श्री. उत्तम पाटील, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, बाबासाहेब भोपळे, दीपक कातवरे उपस्थित होते.