Menu Close

वाराणसी येथे दुकानावर पाकचा झेंडा फडकावणार्‍या तरुणाला अटक

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील भवानीपूर गावामध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर स्वतःच्या दुकानावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावणार्‍या महंमद ताज या २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. झेंडा लावतांना शेजारील लोकांनी त्याला विरोध केला असता त्याने लोकांशी वाद घातला. या वेळी ताज याने पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली.

 

कुटुंबियांचे म्हणणे आहे की तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे. (जर तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे, तर त्याला पाकचाच झेंडा फडकावण्याची बुद्धी कशी होते ? त्याने भारताचा झेंडा का फडकावला नाही ? अशा कथित मनोरुग्णांवर सरकारने आता कठोर उपाय करणे आवश्यक झाले आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *