त्रिशूर (केरळ) – येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची विद्यार्थी संघटना ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’ने (‘एस्.एफ्.आय.’ने) येथील श्री केरळ वर्मा महाविद्यालयामध्ये लैंगिक स्वातंत्र्याच्या नावाखाली आक्षेपार्ह आणि अश्लील फलक लावून भारतीय परंपरेचा अवमान केल्याचे समोर आले आहे. या फलकांमध्ये राष्ट्रप्रेमी लोकांची हेटाळणी करण्यासह जिहाद्यांचा गौरव करण्यात आला आहे. याविषयी सर्वोच्च न्यायालयात अधिवक्ता मोनिका अरोरा यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. श्री केरळ वर्मा महाविद्यालयाचे नियंत्रण कोचीन देवस्वम् मंडळाकडे आहे. मंडळाच्या सदस्यांची नियुक्ती केरळ सरकार आणि हिंदु समाज यांच्याकडून केली जाते.
‘Abuse for Nationalism, Praise for Jihadism’, SFI posters with nude paintings and provocative captions in Sri Kerala Varma College receive widespread condemnation https://t.co/S5prLcSmgA
— Organiser Weekly (@eOrganiser) October 28, 2021
१. या फलकांपैकी एकावर २ देशांची सीमा दाखवण्यात आली आहे. तेथे एक सैनिक पहारा देत आहे. हा सैनिक दुसर्या देशाच्या सीमेवरील महिलेचे चुंबन घेतांना दाखवले आहे आणि त्या फलकाखाली अश्लील भाषेत लिखाण करण्यात आले आहे. ही दोन देशांची सीमा म्हणजे भारत आणि पाकिस्तान असल्याचे लक्षात येते.
२. दुसर्या फलकाद्वारे लैंगिक स्वातंत्र्याचे समर्थन करण्यात आले आहे. यात एक महिला आणि पुरुष नग्न होऊन चुंबन घेत आहेत. यावर लिहिले आहे की, पृथ्वीवर लैंगिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे.
३. तिसर्या फलकावर मुसलमान व्यक्ती अमेरिकेचा राष्ट्रध्वज असलेली पॅन्ट घालून खुर्चीवर बसला आहे आणि त्याच्या बाजूला एके-४७ रायफल आहे. ‘हे चित्र अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेणे आणि तालिबानने शासन स्थापित करण्यावर आधारित आहे’, असे सांगितले जात आहे.