उनाकोटी (त्रिपुरा) – येथे शुक्रवार, २९ ऑक्टोबर या दिवशी कैलाशहर भागातील महाकाली मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून मूर्तीची तोडफोड केली, तसेच मंदिराचीही हानी केली. ‘जमावाने येथील एका मशिदीला आग लावली’, हा अफवेनंतर धर्मांधांनी ही तोडफोड केली. दुसर्या एका घटनेत अखिल भारतीय विद्यार्थी परिदेचे पदाधिकारी शिवाजी सेनगुप्ता यांच्यावर काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटना एन्.एस्.यू.आय., तसेच तृणमूल काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटना तृणमूल छात्र परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण केले. यात सेनगुप्ता घायाळ झाले. शुक्रवारी राज्यातील १ सहस्र १०० मशिदींमध्ये मुसलमानांना हिंदूंच्या विरोधात चिथावणी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासूनच प्रशासनाने या भागात कलम १४४ लागू करून जमावबंदी केली आहे. (जमावबंदी असतांना धर्मांध अशा प्रकारचा हिंसाचार कसे करू धजावतात ? पोलीस या वेळी कुठे होते ? जमावबंदी असूनही अशी घटना घडणार असेल, तर हिंदूंनी कर भरून पोलिसांना पोसायचे तरी कशाला ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)
Tripura: Islamists vandalise Kali temple, NSUI and TMCP members stab ABVP worker in Kailashaharhttps://t.co/hqPhInp3HY
— OpIndia.com (@OpIndia_com) October 30, 2021
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक दैनिक सनातन प्रभात |