Menu Close

भारत-नेपाळ सीमेवर गेल्या २ दशकांत मशिदी आणि मदरसे यांच्या संख्येत ४ पटींनी वाढ !

गुप्तचरांचे लक्ष, तर सुरक्षायंत्रणा सतर्क !

  • मदरसे आणि मशिदी ४ पटींना वाढेपर्यंत पोलीस, सुरक्षायंत्रणा आणि प्रशासन झोपले होते का ? आताही अशांवर कारवाई का केली जात नाही ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • सीमेवर मंदिरे का निर्माण होत नाहीत ? आणि झाली, तर त्यांच्यावर असे लक्ष का ठेवावे लागत नाही ?, यांविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी सांगतील का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
मदरसा (प्रातिनिधिक छायाचित्र)

नवी देहली – गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या गोपनीय माहितीनुसार भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवर गेल्या २० वर्षांत मशिदी आणि मदरसे यांच्या संख्येत ४ पट वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस सतर्क असून या मशिदी आणि मदरसे यांवर ते लक्ष ठेवून आहेत. येथून कोणत्याही देशविघातक कारवाया होऊ नयेत, यासाठीही ते सतर्क आहेत. यासह या मशिदी आणि मदरसे यांची चौकशी चालू केली आहे.

१. सीमेवरील सिद्धार्थनगर जिल्ह्यामध्ये ५९७ मदरसे आहेत. त्यांतील ४५२ नोंदणीकृत आहेत, तर १४५ मदरशांची कोणतीही नोंदणी नाही. आता गुप्तचर यंत्रणा नोंदणी नसलेले मदरसे कोण आणि कशा प्रकारचे चालवत आहे ? त्यांना अर्थपुरवठा कोण करत आहे ? आदींची चौकशी करत आहेत. या मदरशांना दुबई आणि आखाती देश येथून पैसे मिळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वर्ष १९९० पर्यंत येथे केवळ १६ मान्यताप्राप्त मदरसे होते. वर्ष २००० मध्ये त्यांची संख्या १४७ झाली. त्यांतही केवळ ४५ मदरसेच मान्यताप्राप्त होते.

२. जिल्हा अल्पसंख्यांक कल्याण अधिकारी तन्मय कुमार यांनी सांगितले की, मदरसा कुणीही उघडू शकतो. शासनाकडून मान्यताप्राप्त मदरशांना अनुदान दिले जाते.

३. सशस्त्र सुरक्षा दलाच्या ४३ व्या वाहिनीचे उप कमांडेंट मनोज कुमार यांनी सांगितले की, ज्या मदरशांची नोंदणी नाही, त्यांच्यावर लक्ष ठेवले जात असून त्यांची माहिती सरकारला दिली जात आहे.

४. नेपाळमध्ये सीमेवरील जिल्ह्यांमध्ये मुसलमानांच्या लोकसंख्येत अडीच पट वाढ झाली आहे, तसेच २ वर्षांतच येथे ४०० मशिदी आणि मदरसे बांधण्यात आले आहेत. सुरक्षेविषयीच्या तज्ञांच्या मते हा पालट सामान्य नसून त्यांवर लक्ष ठेवले गेले पाहिजे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *