नागपूर – देवतांचे विडंबन करणार्या फटाक्यांची विक्री करण्यावर बंदी असतांनाही जिल्ह्यातील वेलतूर येथील फटाक्यांच्या दुकानांत देवतांची चित्रे असलेले फटाके विक्रीस ठेवण्यात आले होते. हे निदर्शनास येताच राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या विदर्भ प्रांताच्या वतीने परिषदेचे विदर्भप्रमुख ह.भ.प. ओमदेव महाराज चौधरी यांनी २ नोव्हेंबर या दिवशी पोलीस ठाण्यात याविषयी निवेदन दिले. त्यांच्यासमवेत श्री. कुलदीप कुलरकार आणि ह.भ.प. दिवाकर महाराज शिवरकर उपस्थित होते. यानंतर पोलिसांनी देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री केली जाणारी ३ दुकाने बंद केली. ‘देवतांची चित्रे असलेले फटाके विकणार्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करा’, असे आवाहन राष्ट्रीय वारकरी परिषदेने हिंदूंना केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, फटाक्यांवर असलेल्या श्री लक्ष्मीमाता आणि इतर देवता यांच्या चित्रांमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे दुकानदारांच्या विरोधात गुन्हा नोंद करावा.
वेलतूर (नागपूर) येथे पोलिसांनी देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री केली जाणारी ३ दुकाने बंद केली !
Tags : देवतांचे विडंबन