Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील भाजपच्या नगरसेवकांना हलाल अर्थव्यवस्थेविषयी दिली माहिती !

श्री. रमेश शिंदे ‘हलाल’ संदर्भात मार्गदर्शन करतांना…

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – येथील भाजपच्या कार्यालयामध्ये २ नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी भाजपचे नगरसेवक, अन्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांना हलाल अर्थव्यवस्थेविषयी माहिती दिली.

प्रारंभी दक्षिण कर्नाटकाचे समितीचे समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी सर्वांना श्री. रमेश शिंदे यांचा परिचय करून दिला. श्री. शिंदे यांनी माहिती दिल्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी शंकानिरसन करण्यात आले. नगरसेवक श्री. तिप्पण्णा मज्जिगी यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. इतकी माहिती आणि इतका गंभीर विषय आम्हाला ठाऊक नव्हता. हे प्रत्येकापर्यंत पोचवले पाहिजे, असे उपस्थित सर्व जण म्हणाले. अशा प्रकारची बैठक आम्ही आमच्या क्षेत्रात आयोजित करू, असे काही नगरसेवकांनी सांगितले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *