मुळात प्रशासनाने कुठलाही विचार न करता आणि जनतेला त्रास होणार नाही ना, हे न पहाता अनुमती दिलीच कशी, हा प्रश्न आहे. याला उत्तरदायी असणार्यांवरही कारवाई झाली पाहिजे !
गुरुग्राम (हरियाणा) – येथील प्रशासनाने ३७ पैकी ८ सार्वजनिक ठिकाणी मुसलमानांना नमाजपठण करण्यास दिलेली अनुमती मागे घेतली. हिंदूंच्या विरोधानंतर हा निर्णय घेण्यात आला. ‘अन्य ठिकाणच्या नमाजपठणाविषयी लवकरच निर्णय घेतला जाईल’, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या जागांना पर्यायी जागा शोधण्यात येणार असून यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत हिंदु आणि मुसलमान धर्मांतील प्रतिनिधींचा समावेश आहे. ही समिती रस्त्यांवर नमाजपठण केले जाणार नाही, असे पाहण्यास, तसेच ज्या जागा निश्चित करण्यात येणार आहेत, तेथील नागरिकांना कोणताही आक्षेप नाही ना, याचीही निश्चिती करणार आहे.
Gurugram administration withdraws the controversial order of permitting Namaz to open at eight sites.
We had filed the RTI in this regard as well.
A win for all the Hindus. https://t.co/cN2EguTUQ3
— Hindu IT Cell (@HinduITCell) November 2, 2021
‘हिंदु आयटी सेल’ या संघटनेकडून पहिल्यांदा येथील सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्यास विरोध करण्यात आला होता. ‘हा हिंदूंचा विजय आहे’, असे या संघटनेने याविषयी म्हटले आहे. (‘हिंदु आयटी सेल’ संघटनेचे अभिनंदन ! अद्याप हा लढा पूर्ण झालेला नाही. त्यामुळे हिंदूंनी अवैधपणे सार्वजनिक ठिकाणी चालणारे नमाजपठण रहित होण्यापर्यंत लढा चालू ठेवला पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात )