सांगली – हिंदूंचा व्यापार आणि अर्थव्यवस्था यात हस्तक्षेप करून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ‘हलाल प्रमाणपत्र’ हे जागतिक षड्यंत्र आहे. अशा ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी सांगली जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी संपर्क अभियानाद्वारे जागृती केली. या अभियानात उद्योजक, व्यापारी, शेतकरी, प्राध्यापक, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, ‘सनातन प्रभात’चे वाचक असा समाजातील विविध प्रकारच्या घटकांचा समावेश होता. विषय ऐकल्यावर सर्वांनीच ‘हा विषय गंभीर असून त्यांच्या स्तरावर ते याविषयी जागृती करण्यासाठी प्रयत्न करतील’, असे सांगितले.
१. पलूस येथे श्री. शिवाजीराव बर्गे यांच्या घरी झालेल्या संपर्क अभियानात उद्योजक सर्वश्री सुनील साळुंखे, भीमराव जाधव, शरद पाटील, साहेबराव पाटील, प्रा. विजय पाटील, प्रगतीशील शेतकरी श्री. संजय बर्गे आणि श्री. राजेंद्र बर्गे, धर्मप्रेमी श्री. अविनाश धोत्रे यांसह २२ जण उपस्थित होते. या वेळी श्री. भीमराव जाधव यांनी ‘हलाल’ या विषयाच्या संदर्भातील निवेदन मागवून घेऊन ‘हा विषय समाजापर्यंत पोचवू’, असे सांगितले.
२. ईश्वरपूर येथे धर्मप्रेमी सौ. मंगल खोत यांच्या घरी झालेल्या बैठकीसाठी उद्योजक श्री. किरीट पटेल आणि त्यांचे सहकारी, अधिवक्ता श्री. अभय देसाई, कृषी उत्पन्न बाजार समितीतील माजी अधिकारी श्री. आनंदराव पाटील, बत्तीस शिराळा येथील शिवसेनेचे श्री. निलेश आवटे, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. शुभम् देशमुख, धर्माभिमानी श्री. अजित जाधव यांसह १५ जण उपस्थित होते. श्री. किरीट पटेल यांनी ‘माझे संपर्क गुजरातपर्यंत असून पाटीदार समाजापर्यंत हा विषय पोचवू’, असे या वेळी सांगितले.
३. विश्रामबाग येथील उद्योजक श्री. विहंग शहा यांच्या घरी झालेल्या संपर्क अभियानाप्रसंगी अधिवक्ता रूपचंद लालवाणी, शिरोळ येथील उद्योजक श्री. रवींद्र महात्मे, गणेशवाडी येथील शेतकरी श्री. महादेव अणुरे, विमा प्रतिनिधी श्री. सुशील भुर्के यांसह १५ जण या वेळी उपस्थित होते.