Menu Close

अंबिकापूर (छत्तीसगड) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न हिंदु संघटनांनी उधळला !

साल्वेशन मिंज हा ख्रिस्ती मिशनरी पोलिसांच्या कह्यात

देशात धर्मांतरविरोधी कायदा अस्तित्वात नसल्याने ख्रिस्ती मिशनरी अजूनही हिंदूंचे धर्मांतर करतात. सरकारने याकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर धर्मांतरविरोधी कायदा करावा !

अंबिकापूर (छत्तीसगड) – येथील उदयपूर ढाप या गावात आजार दूर करण्याच्या नावाखाली भोळ्या भाबड्या हिंदूंचे धर्मांतर करण्याचा ख्रिस्ती मिशनरीचा प्रयत्न हिंदु संघटनांनी उधळून लावला.

राज्यातील बिलासपूर जिल्ह्यात रहाणारा साल्वेशन मिंज हा ख्रिस्ती मिशनरी उदयपूर ढाप गावामध्ये गेल्या २ दिवसांपासून तळ ठोकून होता. त्याने येथे प्रार्थनासभेचे आयोजन केले होते. याची माहिती मिळाताच भारतीय जनता युवा मोर्चा, बजरंग दल आणि विश्‍व हिंदु परिषद यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तेथे पोचले अन् त्यांनी मिंज याचा डाव उधळून लावला. त्याच वेळी पोलीसही तेथे पोचले. त्यांनी मिंज याला कह्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *