Menu Close

‘राहुल पटेल’ नाव धारण करून धर्मांधाने हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर केला बलात्कार !

  • सूरत (गुजरात) येथे ‘लव्ह जिहाद’ची आणखी एक घटना

  • धर्मांतर करण्यासाठी युवतीवर दबाव टाकला !

  • बलपूर्वक नमाजपठण करायला लावले !

आधुनिकतावादी, पुरो(अधो)गामी पत्रकार आणि काही राजकारणी यांना ‘लव्ह जिहाद’ हे षड्यंत्र नसून ते दोन धर्मियांमधील मिलन वाटते. मग धर्मांध आपली खरी ओळख लपवून खोट्या नावाने हिंदु मुलींना का फसवतात ? याचेही उत्तर त्यांनी देणे आवश्यक आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

(प्रतिकात्मक छायाचित्र)

सूरत (गुजरात) – जिल्ह्यामध्ये ‘लव्ह जिहाद’ची आणखी एक घटना समोर आली आहे. येथील पुणागाम भैयानगरजवळील नारायणनगर येथे रहाणारा महंमद मलिक (वय २१ वर्षे) या धर्मांधाने ‘राहुल पटेल’ नाव धारण करून एका १७ वर्षीय हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव निर्माण केला, तसेच तिला बलपूर्वक नमाजपठणही करायला लावले. आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत दिल्यानंतर पोलिसांनी युवतीला मलिकच्या तावडीतून सोडवले आणि त्याला अटक केली. मलिक याच्या विरोधात ‘लव्ह जिहाद’ कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

अटक करण्यात आल्यानंतर मलिक याने सांगितले की, माझी आई हिंदु असून वडील मुसलमान आहेत. त्यामुळे माझे सर्व भाऊ-बहिणी इस्लामला मानतात. (यावरून आरोपीची आईही ‘लव्ह जिहाद’ला बळी पडली होती आणि ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र किती पूर्वीपासून चालू आहे, हे लक्षात येते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

हिंदु युवतीला फसवण्यासाठी धर्मांधाने स्वतःच्या हातावर ‘राहुल’ नावही कोरले होते !

पीडितेने पोलिसांकडे जबाब नोंदवतांना सांगितले की, महंमद मलिक याने माझ्याशी मैत्री केली, तेव्हा त्याने त्याचे नाव ‘राहुल’ असे सांगितले होते. एवढेच नाही, तर त्याने स्वतःच्या हातावर ‘राहुल’ नावही कोरलेले होते. त्यामुळेच मी त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात फसले. मलिकची खरी ओळख मला समजल्यावर त्याने माझ्यावर धर्मांतर करण्याचा दबाव टाकला, तसेच बलपूर्वक नमाजपठणही करायला लावले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *