असे व्हायला वाराणसी भारतात आहे कि पाकिस्तानात ? उत्तरप्रदेशमधील भाजप सरकारने या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी हिंदूंची मागणी आहे ?
वाराणसी (उत्तरप्रदेश) – रामपूर येथे मृतदेह दफन करण्यासाठी नट समाजाच्या लोकांना इस्लाम स्वीकारण्याची अट घालण्यात आल्याची घटना घडली. रामपूर येथील नट समाजाच्या सुशीला देवी यांचा मृत्यू झाला होता. या समाजामध्ये मृतदेह दफन करण्याची प्रथा आहे. त्यांचा मृतदेह दफन करण्यासाठी पती सचाऊ नट आणि नातेवाईक भरावर बस्ती येथे पोहचले; परंतु त्यांना अंतिम संस्कार करण्यापूर्वी इस्लाम स्वीकारण्याची अट घालण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले, तसेच पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.
अंतिम संस्कार के लिए इस्लाम कबूलने की शर्त, वाराणसी में हिंदू नट समुदाय ने पुलिस में की शिकायत#Varanasi #Conversionhttps://t.co/sfJsXAi7YR
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 7, 2021
ज्या भूमीवर मृतदेह दफन करण्यास अडथळा आणण्यात आला, ती भूमी हिंदूंची असून तेथे परंपरेप्रमाणे नट समाजाचे मृतदेह दफन करण्यात येतात. या प्रकरणी ३० ऑक्टोबर या दिवशी स्थानिक फूलपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट करण्यात आली. या तक्रारीमध्ये त्यांनी भू-समाधी परंपरेमध्ये अडथळा निर्माण केल्याचे म्हटले आहे.
यामागे नट समाजातील यापूर्वी इस्लाम स्वीकारलेल्या व्यक्तींचाच हात ! – हिंदु जनजागरण मंच
बाटगे अधिक कडवे असतात, हेच यावरून सिद्ध होते !
हिंदु जनजागरण मंचाने दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. या वेळी हिंदु जनजागरण मंचाचे पदाधिकारी गौरीश सिंह यांनी सांगितले की, इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव निर्माण करणारे लोक पूर्वी नट समाजाचे होते. कालांतराने त्यांनी इस्लाम स्वीकारला. आता ते धर्मांतरासाठी समाजाच्या अन्य लोकांवर दबाव टाकत आहेत. याशिवाय नट समाज अनुसूचित जाती वर्गामध्ये येतो. नट समाजाच्या काही लोकांनी इस्लाम स्वीकारला असला, तरी त्यांनी त्यांची नावे हिंदूच ठेवली आहेत. यामागे समाज आणि सरकार यांची दिशाभूल करून अनुसूचित जातीला मिळणारे सरकारी लाभ उठवत रहाण्याचे षड्यंत्र आहे. (जी माहिती एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेला मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्या प्रशासनाला कशी मिळत नाही ? सरकारने संबंधित उत्तरदायी अधिकार्यांवर कारवाई केली पाहिजे, तसेच धर्मांतरानंतरही हिंदु नाव कायम ठेऊन सरकारी सोयीसुविधा लाटणार्या बाटग्यांवर कारवाई केली पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)