‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’च्या अध्यक्षांनी अचानक भेट देऊन केले उघड !
|
रायसेन (मध्यप्रदेश) – येथील ‘ख्रिश्चन मिशनरी गर्ल्स हॉस्टेल’मध्ये चालू असलेला धर्मांतराचा प्रयत्न ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी उघड केला. कानूनगो यांनी या हॉस्टेलला अचानक भेट दिली असता त्यांना येथे आदिवासी हिंदु तरुणींना आणण्यात आल्याचे दिसून आले. येथे या तरुणींना ख्रिस्त्यांची धार्मिक पुस्तके देऊन ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित करण्यात येत असल्याचेही कानूनगो यांच्या निदर्शनास आले. यानंतर ‘हिंदूंचे धर्मांतर करणार्यांवर कारवाई करण्यात येईल’, असे त्यांनी सांगितले.
ईसाई मिशनरियों के छात्रावास का औचक निरिक्षण, चला रहे थे धर्मान्तरण का धंधा
पूरा वीडियो – https://t.co/E6UBBpwq6k pic.twitter.com/CtKbv29AYf
— प्रियंक कानूनगो Priyank Kanoongo (@KanoongoPriyank) November 9, 2021
कानूनगो पुढे म्हणाले की, येथे या मुलींना इतरांचे धर्मांतर करण्याचे विशेष प्रकारचे प्रशिक्षण देऊन सिद्ध केले जात होते. या मुली येथील सरकारी शाळेत शिकत आहेत. याची चौकशी होण्याची आवश्यकता असून आम्ही ती करत आहोत.