२०० हिंदूंचे करण्यात येणार होते धर्मांतर !
या घटनेतून देशभरात धर्मांतरबंदी कायदा करण्याची आणि त्याची कठोर कार्यवाही करण्याची आवश्यकता स्पष्ट होते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
बेळगाव (कर्नाटक) – श्रीराम सेना, हिंदु राष्ट्र सेना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी बेळगाव येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न हाणून पाडला.
एका ख्रिस्ती पाद्य्राने प्रार्थनेच्या नावाखाली ७ नोव्हेंबर या दिवशी मराठा कॉलनी येथील एका इमारतीत ग्रामीण भागातील २०० हिंदूंना धर्मांतरासाठी एकत्र जमवले होते. श्रीराम सेना, हिंदु राष्ट्र सेना आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या कार्यकर्त्यांना ही माहिती मिळताच त्यांनी या इमारतीला वेढा दिला अन् पोलिसांना बोलावले. पोलीस येईपर्यंत हिंदुत्वनिष्ठांनी या इमारतीतील एकाही व्यक्तीला बाहेर पडू दिले नाही. या प्रकरणी पाद्री लिमा चेरीयन यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंद झाला आहे. तेथे जमलेल्या नागरिकांपैकी एकाने त्या पाद्य्राच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, अशी माहिती श्रीराम सेना आणि हिंदु राष्ट्र सेना यांचे जिल्हाध्यक्ष श्री. रवी कोकीतकर यांनी दिली. ‘प्रत्येक रविवारी नियमितपणे अशी प्रार्थना केली जाते’, अशी माहिती पोलीस आणि पाद्री लिमा चेरीयन यांनी दिली.