Menu Close

‘सार्वजनिक स्थळांवर नमाज का ? ’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

सार्वजनिक ठिकाणांवरील अवैध नमाजपठण थांबविण्यासाठी गुरुग्रामच्या हिंदू नागरिकांप्रमाणे लढा देण्याची आवश्यकता ! – नीरज अत्री

पोलिस आणि प्रशासन राजकीय नेत्यांच्या इशार्‍यांवर चालतात, हे देशभरात गेली अनेक वर्षे आपण अनुभवत आहोत. सार्वजनिक ठिकाणी होणारे अवैध नमाजपठण हे देशभरातील सभ्यतेला आव्हान आहे. गुरूग्राममध्ये उघडपणे रस्त्यांवर सुरू असलेल्या अवैध नमाजपठणाला तेथील हिंदू नागरिकांनी तसेच संघटनांनी ज्या प्रकारे विरोध केला, तसा विरोध देशभरात सर्व ठिकाणी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विवेकानंद कार्य समितीचे अध्यक्ष श्री. नीरज अत्री यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘सार्वजनिक स्थळांवर नमाज का ?’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

‘वोट बँके’च्या राजकारणासाठी संविधानाचे पालन न करता विशिष्ट समाजाला सूट दिली जात आहे, हे गेली ७० वर्षे या देशात होत आहे. भारतीय संविधानानुसार ‘कोणालाही बाधा उत्पन्न होईल, अशी कृती करण्याचा अधिकार नाही’, मात्र सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करून रस्त्याने जाणारे पादचारी, वाहनांतील प्रवासी या सर्वांना ताटकळत ठेवले जाते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणारे अवैध नमाजपठण थांबविण्यासाठी न्यायालयीन मार्गाने लढा देण्याची आवश्यकता आहे. अधिवक्त्यांनी यासाठी याचिका दाखल करण्यास पुढाकार घेतला पाहिजे, असे मत सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता गौरव गोयल यांनी मांडले.

मुस्लिम देशांतही सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणावर बंदी; तर सेक्युलर भारतात हे लाड का ?

हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. नरेंद्र सुर्वे या संदर्भात म्हणाले, ‘सार्वजनिक ठिकाणी नमाज पठणासाठी मशिदींमध्ये जागा कमी पडत असल्याचा तर्क सांगितला जात आहे, जो पूर्णत: चुकीचा आहे. जर त्याचप्रकारे हिंदूंनीही पूजा-अर्चा, आरती आदी करण्यास मंदिरांत जागा कमी असल्यामुळे आम्हीही सार्वजनिक ठिकाणी हे करतो, असे सांगितल्यास ते चालेल का ? आज अनेक मुस्लिम देशांत सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करण्यास बंदी आहे, तसेच असे कोणी केल्यास त्या व्यक्तींकडून मोठा दंड आकारला जातो. मग ‘सेक्युलर’ भारतात सार्वजनिक ठिकाणी अवैध पध्दतीने नमाज पठणाला पोलिसांकडून अनुमती का दिली जाते ? हिंदूंना मात्र सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव सारख्या नियमित उत्सवांनाही अनुमती मिळवण्यास किती झगडावे लागते ! त्याच वेळी गुरुग्रामसारख्या आधुनिक शहरात पोलीस सुरक्षेत सार्वजनिक ठिकाणी नमाजपठन केले जात होते, हे आश्चर्यजनक आहे. हिंदूंनी याचा निषेध करून याविरोधात संविधानिक मार्गाने लढा दिला पाहिजे.’

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *