|
हिंदू संघटित नसल्यामुळेच कुणीही उठतो आणि हिंदु धर्माचा अवमान करतो. त्यामुळे हिंदूंनी आता संघटित होऊन कुणीही हिंदु धर्माचा अवमान करू धजावणार नाही, अशी स्वतःची पत निर्माण केली पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात |
नेवाडा (अमेरिका) – ब्रुक्लीन (न्यूयॉर्क) येथील ‘इट्सी’ या ऑनलाईन साहित्य विक्री करणार्या आस्थापनाने अन्नधान्याचे विज्ञापन करणार्या टी-शर्टवर श्री महाकालीमातेचे चित्र प्रसिद्ध करून हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अवमान केला आहे. ‘व्यापारविषयक स्वार्थ साधण्यासाठी हिंदूंच्या देवतांचा वापर करणे अयोग्य आहे. ‘इट्सी’ आस्थापनाने हे टी-शर्ट तातडीने मागे घ्यावे, तसेच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याविषयी जाहीर क्षमायाचना करावी’, अशी मागणी अमेरिकेतील संतप्त धर्माभिमानी हिंदूंनी केली आहे. (हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्या ‘इट्सी’ आस्थापनाच्या विरोधात आवाज उठवणार्या अमेरिकेतील जागृत हिंदूंचे अभिनंदन ! अमेरिकेतील हिंदूंकडून बोध घ्यावा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)
#UpsetHindus seek #ApologyFromEtsyForDesecratingGoddessKalihttps://t.co/6OG9kKS0iy
— Rajan Zed (@rajanzed) November 9, 2021
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |