Menu Close

महाराष्ट्रात धर्मांधांचा ७ ठिकाणी मोर्चे काढून हिंसाचार !

त्रिपुरा राज्यात मशिदी पाडल्याच्या कथित घटनांचे पडसाद

  • नांदेडमध्ये गाड्या जाळल्या !

  • अमरावती येथे दुकानांची तोडफोड !

  • मोर्च्यामध्ये ‘रझा अकादमी’चा सहभाग !

  • धर्मांधांच्या हिंसाचारात नांदेडमध्ये २ पोलीस घायाळ !

  • मालेगाव येथील मोर्च्यात १० सहस्र धर्मांधांचा सहभाग !

  • मालेगाव आणि अमरावती येथे विनाअनुमती मोर्चा !

  • धर्मांधांनी उघडपणे हिंसाचार करूनही त्यांना रोखू न शकणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस कधी आतंकवाद्यांना रोखू शकतील का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • ‘धर्मांधांचे मोर्चे, म्हणजे पुढे त्याचे दंगलीत रूपांतर’, हा आजवरचा इतिहास असतांना पोलीस या मोर्च्यांना अनुमती देतातच कशी ? पोलीस अनुभवातून शिकत नाहीत कि त्यांच्यावर कुणाचा दबाव असतो ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • त्रिपुरा राज्यातील कथित घटनेविषयी महाराष्ट्रातील धर्मांध एकत्र येऊन दंगल व्हावी, असे मोर्चे काढतात; किती हिंदू ते आणि त्यांची मंदिरे यांवरील आक्रमणांचा शाब्दिक निषेध तरी नोंदवतात ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • पोलिसांचा बंदोबस्त असतांना धर्मांधांकडून हिंदूंना लक्ष्य केले जाणे, हे शासनाला लज्जास्पद ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

मुंबई – त्रिपुरा राज्यात काही मशिदी पाडल्याच्या कथित घटनांच्या निषेधार्थ भिवंडी, मालेगाव, मनमाड, अमरावती, हिंगोली, नांदेड आणि सांगलीतील ईश्वरपूर (इस्लामपूर) या ठिकाणी धर्मांधांनी शुक्रवार, १२ नोव्हेंबर या दिवशी नमाजानंतर मोर्चा काढला.  काही ठिकाणी धर्मांधांनी मोर्च्याच्या वेळी नेहमीप्रमाणे दुकाने फोडून, रस्त्यावरील वाहनांची हानी करून दंगलसदृश वातावरण निर्माण केले. यासह त्यांनी या परिसरांत दहशतीचेही वातावरण निर्माण केले.

बांगलादेशात हिंदूंवर जे प्रचंड अत्याचार झाले, त्यानंतर त्रिपुरा राज्यात मशिदी पाडल्याचे आरोप करण्यात आले. त्याचा निषेध म्हणून हे मोर्चे काढल्याचे सांगितले जात आहे. (धर्मांधांकडून एकाच दिवशी विविध ठिकाणी मोर्चे काढणे आणि त्यांत दंगलसदृश वातावरण निर्माण करणे, यावरून ‘दहशत पसरवण्याची कृती धर्मांध कशी ठरवून करतात’, हेच पुन्हा पुन्हा सिद्ध होते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) या हिंसाचारामध्ये नांदेड येथे २ पोलीस घायाळ झाले, तर अमरावती येथे काही पोलीस घायाळ झाले.

भिवंडी येथे मोर्च्यात अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा !

येथे ‘रझा अकादमी’ने काढलेल्या मोर्च्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि एम्.आय.एम्. या राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला होता. धर्मांधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे ८०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मालेगाव येथे विनाअनुमती मोर्चा : धर्मांधांकडून दगडफेक !

मालेगाव येथे ‘सुन्नी जमियतुल उलेमा’ आणि ‘रझा अकादमी’ यांनी मोर्चा काढला होता. या मोर्च्याला पोलिसांची अनुमती नव्हती. येथे काळे ध्वज लावून बंद पाळण्यात आला. या वेळी धर्मांधांनी प्रचंड प्रमाणात दगडफेक करून दुकानांची हानी केली. त्यामुळे रस्त्यांवर दगडांचा खच पडला होता. येथील यंत्रमाग कामगार आणि मुसलमान व्यापारी यांनी त्यांचे व्यवसाय बंद ठेवले होते.

अमरावती येथेही विनाअनुमती मोर्चा : हिंदूंची दुकाने फोडली !

अमरावती येथेही धर्मांधांनी अनुमती न घेता मोर्चा काढला होता. (धर्मांधांना पोलिसांचे काडीचेही भय वाटत नाही, हेच यावरून सिद्ध होते. अशांवर आता कठोर कारवाई झाली, तरच पुढील दंगली टळू शकतील ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) धर्मांधांकडून येथे मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. या वेळी हिंदु व्यापार्‍यांची दुकाने फोडण्यात आली. यामध्ये काही हिंदु व्यापारी घायाळ झाले.

नांदेडमध्ये गाड्या जाळल्या !

नांदेड येथे रस्त्यावर गाड्या जाळण्यात आल्या. दुकाने बंद ठेवण्यात आली होती. एका हिंदूच्या मिठाईच्या दुकानाची तोडफोड करण्यात आली. धर्मांध तरुण ‘इतरांना भय वाटेल’, अशा प्रकारे रस्त्यांवर आरडाओरडा करत फिरत होते.

ईश्वरपूर (सांगली) येथे त्रिपुरा राज्यशासन विसर्जित करण्याची मागणी !

त्रिपुरा राज्यात झालेल्या हिंसाचारात अनेक मशिदी पाडल्या गेल्याचा दावा करून ‘त्रिपुरा राज्यातील शासन विसर्जित करावे’, अशी मागणी ईश्वरपूर (सांगली) येथे काढलेल्या मोर्च्यात करण्यात आली.

दोषींवर कठोर कारवाई करू ! – शंभूराजे देसाई, गृहराज्यमंत्री

या घटनांच्या मुळाशी जाऊ. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. हे कुणी केले ?, हे शोधून कारवाई करू. काही जण हे जाणीवपूर्वक करत आहेत. जनतेची सुरक्षा हे आमचे प्रथम प्राधान्य आहे.


 …तर हिंदूंचे पण मोर्चे निघतील ! – भाजपचे आमदार नितेश राणे

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ‘हे मोर्चे थांबले नाहीत, तर हिंदूंचे पण मोर्चे निघतील, हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे’, अशी चेतावणी दिली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *