हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणार्यांना कठोर शिक्षा होत नसल्याने अशा घटना सातत्याने घडत असतात. या घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक दैनिक सनातन प्रभात
मुंबई – ‘नावी’ नावाच्या कर्ज देणार्या आस्थापनाकडून ‘अॅप’ बनवण्यात आले आहे. त्याच्या प्रसारासाठी एक विज्ञापन सिद्ध करण्यात आले आहे. हे विज्ञापन या आस्थापनाच्या यू ट्यूब वाहिनीवर आणि संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या विज्ञापनात एका साधूला ‘फायनान्स बाबा’ म्हणून दाखवण्यात आले आहे. यात हे बाबा भक्तांना कर्जाविषयी मार्गदर्शन करतांना दाखवले आहेत. तेव्हा एक भक्त या बाबांना विचारतो, ‘सर्वांत चांगले आणि अल्प त्रासदायक असलेले कर्ज कुठे मिळू शकते ?’ यावर बाबा उत्तर देतात की, जर तुमचा पगार चांगला असेल, तर विवाह, घराची दुरुस्ती आदींसाठी ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ‘नावी फायनान्स’च्या अॅपद्वारे मिळू शकते आणि तेही केवळ १२ टक्के व्याजावर.
या विज्ञापनास धर्माभिमान्यांकडून पुढील संपर्कावर विरोध केला जात आहे.
इमेल : [email protected]
भ्रमणभाष क्रमांक : ८१४७५४४५५५