Menu Close

हिंदुत्वाला अपकीर्त करणारे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या हिंदुद्वेषी पुस्तकावर बंदी घाला !

  • हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यातील तहसीलदार यांना निवेदन सादर

  • हिंदुद्वेषी खुर्शिद यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचीही मागणी

सिंधुदुर्ग – काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद आणि त्यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’, या पुस्तकाच्या आधारे काँग्रेसचे नेते हिंदु समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, तसेच जगभरात पसरलेल्या हिंदु समाजाच्या संदर्भात अपप्रचार करून त्यांना संकटात टाकत आहेत. हिंदू आणि हिंदुत्व वेगळे भासवून हिंदूंचे श्रद्धाभंजन आणि बुद्धीभेद करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करणारे काँग्रेसचे सलमान खुर्शिद यांचा हिंदु जनजागृती समिती तीव्र निषेध करते. प्रत्यक्षात कोणताही पुरावा नसतांना हिंदुबहुल देशातच हिंदुत्वाला आतंकवादी ठरवून आणि त्याविषयी अपसमज पसरवून देशातील बहुसंख्य हिंदूंची ते मानहानी करत आहेत. हे रोखण्यासाठी सरकारने हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी करणारे  खुर्शिद यांचे ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’, या पुस्तकावर बंदी घालावी, तसेच सलमान खुर्शिद यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्र सरकारकडे केली आहे. याविषयी केंद्रीय गृहमंत्री यांना द्यायचे निवेदन जिल्हाधिकारी, तसेच स्थानिक तहसीलदार यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले की,

१. हिंदु धर्म सर्वसमावेशक आणि विश्वकल्याणाची इच्छा असणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्वाच्या संदर्भात निकाल देतांना त्याला ‘एक उच्च विचारसरणी, आदर्श जीवन जगण्याची पद्धत’, असे म्हटले आहे. असे असतांना केवळ हिंदु समाजाची अपकीर्ती करण्यासाठी आणि हिंदुत्वाविषयी गैरसमज पसरवून ‘हिंदु फोबिया’ (हिंदूंच्या प्रती द्वेष) निर्माण करण्याचा प्रयत्न खुर्शिद यांनी त्यांच्या पुस्तकातून केला आहे.

२. या पुस्तकातून त्यांनी हिंदुत्वाची तुलना ‘इस्लामिक स्टेट’ आणि ‘बोको हराम’ या जिहादी आतंकवादी संघटनांशी केली आहे.

३. अशा प्रकारे लिखाण करून सलमान खुर्शिद यांनी हिंदूंना अपमानित केले आहे. जे वास्तव नाही, त्याचा आभास निर्माण करून हिंदूंना झोडपण्याचे काम काँग्रेस करत आली आहे.

४. ‘सॅटनिक व्हर्सेस’ या अन्य धर्मियांच्या संदर्भातील पुस्तकावर भारतात बंदी घातली जाऊ शकते, तर हिंदुद्वेषी लिखाण असणारे सलमान खुर्शिद यांचे ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकावरही बंदी घालण्यात यावी.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खालील अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

जिल्हा मुख्यालय : येथे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रवींद्र मठपती यांना निवेदन देण्यात आले. या वेळी डॉ. अशोक महिंद्रे आणि श्री. रवींद्र परब उपस्थित होते.

यासह कुडाळ येथे तहसीलदार अमोल पाठक, सावंतवाडी येथे नायब तहसीलदार मनोज मुसळे, कणकवली येथे प्रभारी तहसीलदार सौ. प्रिया परब, मालवण येथे नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, दोडामार्ग येथे नायब तहसीलदार नाना देसाई, देवगड येथे तहसीलदार मारुति नाना कांबळे यांना निवेदन देण्यात आले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *