Menu Close

डॉ. झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेवर ५ वर्षांची बंदी

नवी देहली – जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारा डॉ. झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेवरील बंदीत केंद्र सरकारने ५ वर्षांची वाढ केली आहे. ही संघटना आतंकवादाला खतपाणी घालते, असा आरोप सरकारकडून करण्यात आला आहे. अवैध कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार (यु.ए.पी.ए.नुसार) बंदी घातलेली ही पहिली संघटना ठरली आहे. झाकीर नाईक सध्या मलेशियातून ‘इंटरनेट सॅटेलाईट टी.व्ही.’चा वापर करून जगभरातील त्याच्या अनुयायांशी संवाद साधतो, तसेच प्रचारासाठी सामाजिक माध्यम आणि मुद्रित साहित्य यांचाही वापर करतो.

(सौजन्य : Republic World)

या बंदीविषयी केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले की, ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ देशाच्या सुरक्षेला बाधा पोचेल, अशा कृत्यांमध्ये सहभागी आहे. ही संघटना देशातील शांतता आणि धार्मिक सौहार्द बिघडवू शकते, तसेच देशाच्या धर्मनिरपेक्षतेला धक्का लावू शकते. या संस्थेचा संस्थापक आणि प्रमुख झाकीर नाईक आणि या संघटनेचे सदस्य त्यांच्या अनुयायांना धर्माच्या आधारावर चिथावणी देत आहेत, तसेच त्यांच्यात द्वेष पसरवून शत्रुत्वाची भावना निर्माण करत आहेत. यातून देशाच्या एकतेला बाधा पोचत आहे. झाकीर नाईक याची भाषणे आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर आहेत. यातून तो भारतातील विशिष्ट भागांत धार्मिक द्वेष वाढवून तरुणांना आतंकवादी कृत्यांत सहभागी होण्यास प्रोत्साहन देतो. आता या संघटनेवर बंदी घातली नाही, तर ही संघटना तिच्या समर्थकांना एकत्र करून विध्वंसक कृत्यांमध्ये सहभागी होईल. यामुळे देशाच्या एकतेला धोका निर्माण होईल.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *