मुंबई – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने १७ नोव्हेंबर या दिवशी विधानभवन येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्हे यांनी बाळसाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. विधानभवनात प्रथमच बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. या वेळी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आमदार नाना पटोले, आमदार मनीषा कायंदे यांसह अन्य लोकप्रतिनिधी आणि विधीमंडळातील अधिकारी उपस्थित होते.
विधानभवन येथे प्रथमच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा !
Tags : Trending Topics