केवळ विरोधासाठी विरोध करणारी जनसंघर्ष सेना !
कोल्हापूर – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी रायगडसह ११ किल्ल्यांवर विसर्जित करण्यात येणार आहेत. ‘केंद्र आणि राज्य सरकारच्या पुरातत्व खात्याच्या कायद्याप्रमाणे किल्ल्यांवर अस्थी विसर्जनाला बंदी आहे’, असे कारण देत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी पन्हाळा किल्ल्यावर विसर्जित करण्यास ‘जनसंघर्ष सेने’ने विरोध दर्शवला आहे. (पुरातत्व विभागाने किल्ल्यांवर मद्यपानासह अनेक गोष्टींना बंदी केली आहे. तरीही अनेक किल्ल्यांवर मद्यपानासह अनेक अवैध गोष्टी चालतात. कोल्हापूर जिल्ह्यातच असणार्या विशाळगडावर तर पुरातत्व विभागाच्या नाकावर टिच्चून अतिक्रमण झाले आहे. त्या विरोधात कधी जनसंघर्ष सेनेने आवाज उठवल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे ब्राह्मणद्वेषापोटी विरोध करणे हे अनाकलनीय आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)
असे झाल्यास जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अस्थी कोणत्याही परिस्थितीत पन्हाळा गडावर विसर्जित करू देणार नाही, अशी चेतावणी जनसंघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.