सांगली – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर सांगली जिल्ह्यातील एका तालुक्यात एका पुरोगामी आणि जात्यंध संघटनेने साखरवाटप केले, तसेच आनंदोत्सव साजरा केला. या संदर्भातील काही चलचित्रेही सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली आहेत. (शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांच्या प्रचारासाठी आयुष्यभर जो त्याग केला आहे, त्यातील एक टक्का तरी काम अशा संघटनांनी केले आहे का ? एखाद्याच्या मृत्यूनंतरही केवळ द्वेषापोटी अशा प्रकारे विकृत कृती करणार्या संघटनेवर खरेतर सरकारने स्वत:हून कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) याच प्रकारे बुलढाणा जिल्ह्यातील केळवद येथे शिवशाहिरांच्या निधनाचा आनंदोत्सव जाहीरपणे साजरा करण्यात आला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर सांगली जिल्ह्यातील एका तालुक्यात एका पुरोगामी आणि जात्यंध संघटनेकडून साखरवाटप !
Tags : Featured News