Menu Close

हिंसक पार्श्वभूमी असलेल्या रझा अकादमी संघटनेवर बंदी घाला !

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

१. तहसीलदार सौदागर तांदळे यांना निवेदन देतांना धारकरी 

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तुळजापूर विभागाच्या वतीने त्रिपुरा राज्यात काही मशिदी पाडल्याच्या कथित घटनांच्या निषेधार्थ महाराष्ट्रात विविध ठिकाणी १२ नोव्हेंबर या दिवशी रझा अकादमी या मुसलमान संघटनेच्या धर्मांधांनी मोर्चे काढून दंगल घडवली. या घटनेच्या निषेधार्थ हिंसक पार्श्वभूमी असलेल्या रझा अकादमी संघटनेवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार सौदागर तांदळे यांना देण्यात आले.

या वेळी महंत मावजीनाथ महाराज, महंत इच्छागिरी महाराज, महंत व्यकंटअरण्य महाराज, संजय सोनवणे, सुदर्शन वाघमारे, जिओत्तम जेवळीकर, परीक्षित साळुंके, दीपक पलंगे, सौरभ कदम, योगेश कोळी, रोहित बागल, अथर्व पाटील, दिनेश धनके आदी उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *