Menu Close

अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांची चेतावणी : ‘राममंदिर नाही, तर भाजपला मतदान नाही !’

भाजप हिंदूंच्या भावना समजून घेईल, अशी आशा आहे !

swami_chakrapani

लक्ष्मणपुरी (लखनौ) : सत्ता मिळाल्यानंतरही मोदी शासनाकडून श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही, हे आम्ही सहन करणार नाही. जर येत्या महिन्याभरात राममंदिराच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आला नाही, तर हिंदु महासभा आणि संत सभा संपूर्ण देशात भाजपच्या विरोधात संघर्ष करतील, तसेच भाजपला मतदान न करण्याचेही जनतेला आवाहन करतील, अशी चेतावणी अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.

या वेळी राष्ट्रव्यापी जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज श्रीवास्तव म्हणाले, स्वामीजींच्या नेतृत्वाखाली होणार्‍या प्रत्येक लढ्यामध्ये त्यांचा पक्ष संपूर्णपणे सहकार्य करील. स्वामीजींची लढाई देशाची लढाई असून संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *