जिहादी आतंकवादामुळे वर्ष १९९० मध्ये बंद करावे लागले होते मंदिर !
काश्मिरी हिंदूंच्या संघटित लढ्याला यश
श्रीनगर : येथील मध्यवर्ती भागात असलेले प्राचीन वेताळ भैरव मंदिर २७ वर्षांनंतर उघडण्यात आले. यानंतर काश्मिरी हिंदूंनी श्री भैरव देवाची विधिवत् पूजा-अर्चा केली.
१. वर्ष १९९० मध्ये जिहादी आतंकवाद्यांमुळे ४ लाख ५० सहस्र काश्मिरी हिंदूंना काश्मीर सोडून जावे लागले होते. तेव्हापासून वेताळ भैरव मंदिर बंद करण्यात आले होते.
२. यानंतर स्थानिक धर्मांधांनी या मंदिराची भूमी अनधिकृतरित्या एका बांधकाम व्यावसायिकाला विकून टाकली.
३. यावर काश्मिरी पंडितांनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली, तसेच याविरोधात लढा देण्यासाठी काश्मिरी पंडित संघर्ष समिती स्थापन केली.
४. काश्मिरी पंडित संघर्ष समितीच्या झेंड्याखाली देश-विदेशातील काश्मिरी पंडित संघटित झाले. त्यांनी कायदेशीर मार्ग अवलंबून मंदिराची भूमी सदर बांधकाम व्यवसायिकाच्या कह्यातून यशस्वीपणे मुक्त केली.
५. श्री भैरव देवाची जयंती साजरी करण्याची परंपरा पुन्हा चालू करण्यासाठी देशभरातून, तसेच विदेशातून अनेक काश्मिरी पंडित एकत्र आले होते.
६. एका काश्मिरी हिंदुने दिलेल्या माहितीनुसार, १९९० च्या दशकापूर्वी वेताळ भैरव मंदिरात अमरनाथ यात्रेच्या कालावधीत यात्रेकरूंना विनामूल्य जेवण दिले जात होते. याशिवाय श्री भैरव देवाच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला जात होता. या सोहळ्यात देशाच्या कानाकोपर्यातील भाविक सहभागी होत होते.
काश्मीरमधील ५८३ मंदिरांपैकी बहुतांश मंदिरे जिहादी आतंकवाद्यांकडून उद्ध्वस्त !
काश्मिरी पंडित संघर्ष समितीने दिलेल्या माहितीनुसार वर्ष १९९० पूर्वी काश्मीरमध्ये ५८३ मंदिरे होती. यांपैकी बहुतांश मंदिरे जिहादी आतंकवाद्यांनी उद्ध्वस्त केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात