सातारा येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी
सातारा – नवरात्रोत्सवामध्ये बांगलादेशात हिंदूंचे निर्घृण हत्याकांड झाले. याचा निषेध करण्यासाठी आणि त्रिपुरातील घुसखोरी थांबवण्यासाठी तेथील हिंदूंनी आंदोलन केले; मात्र सामाजिक माध्यमांतून मशीद तोडल्याची हिंदूंची खोटी छायाचित्रे प्रसारित करण्यात आली. यातून संपूर्ण देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्रिपुरा येथील कथित घटनेवरून महाराष्ट्रात दंगल घडवणार्या जिहाद्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सातारा येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. याविषयीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना देण्यात आले आहे.
या वेळी समर्थभक्त शहाजीबुवा रामदासी, हिंदु एकता आंदोलनचे विक्रम पावसकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुकुंदराव आफळे, गणेश मेळावणे, विश्व हिंदु परिषदेचे रवींद्र ताथवडेकर, अतुल शालगर, हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सतीश ओतारी, नगरसेवक विजयकुमार काटवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
निवेदनामध्ये म्हटले आहे की,
१. जिहाद्यांच्या मोर्च्याला मोर्च्याने उत्तर देणार्या हिंदूंवर पोलिसांनी लाठीने आक्रमण केले. तसेच अनेक हिंदूंना अटक केली; मात्र जिहाद्यांनी केलेल्या हिंसाचाराच्या वेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.
२. दंगलीसाठी दगडे, लाठ्या जिहाद्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात अचानकपणे आल्या कुठून ? अशा जिहादी प्रवृत्तीचे कोणतेही धार्मिक लाड न करता कडक पावले उचलून कायदेशीर कारवाई केली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्राचा तालिबान झाल्याविना रहाणार नाही. जिहाद्यांच्या प्रत्येक आंदोलनाला शासन आणि प्रशासनाने कडक बंधने घालावीत. अन्यथा हिंदु माता-भगिनी आणि बांधव यांच्या संरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरून महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करू.
३. सातारा जिल्ह्यात दंगलीस प्रोत्साहन देण्यासाठी रोहिंग्या, बांगलादेशी, पाकिस्तानी, तालिबानी लपून बसले असतील, तर त्यांना तातडीने अटक करावी. तसेच त्यांना आश्रय देणार्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी.