Menu Close

(म्हणे) पाकचे पंतप्रधान इम्रान खान माझे मोठा भाऊ ! – पंजाबचे काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू

काही वर्षांपूर्वी सिद्धू यांनी पाकचे सैन्यदलप्रमुख कमर बाजवा यांची घेतली होती गळाभेट !

  • जर इम्रान खान हे सिद्धू यांचे मोठे भाऊ आहेत, तर सिद्धू त्यांना पाकने बळकावलेले काश्मीर परत देण्यास का सांगत नाहीत ? काश्मीरधील आतंकवाद रोखण्यासाठी का सांगत नाहीत ? पाकमध्ये होणारा हिंदू आणि शीख यांचा नरसंहार रोखण्यासाठी का सांगत नाहीत ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • अशा राष्ट्राभिमानशून्य व्यक्तींना काँग्रेस पदाधिकारी बनवते, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

पंजाबचे काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू व पाकचे पंतप्रधान इम्रान खान

नवी देहली – पाकमध्ये असलेल्या करतारपूर साहिब गुरुद्वाराच्या दौर्‍यावर गेलेले पंजाबच्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचे तेथे मोठे स्वागत करण्यात आले. त्या वेळी सिद्धू म्हणाले, ‘पाकचे पंतप्रधान इम्रान खान हे माझे मोठा भाऊ आहेत. त्यांनी मला फार प्रेम दिले आहे.’ त्यांच्या या विधानावर भाजपने टीका केली आहे. सिद्धू यांची पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी जवळीक दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यालाही सिद्धू उपस्थित होते. तेथे त्यांनी पाकचे सैन्यदलप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतली होती.

 

यावर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, सिद्धू यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानविषयी प्रेम दाखवले आहे. ते नेहमीच पाकिस्तानचे कौतुक करत असतात. हे काँग्रेसचे सुनियोजित कारस्थान आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *