Menu Close

सलमान खुर्शिद यांनी पुस्तकाद्वारे केलेला हिंदुत्वाचा अवमान हा ‘पॅन इस्लाम’च ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन वाहिनी’

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

‘काँग्रेसचा वैचारिक आतंकवाद’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

हिन्दुदेष्टांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यापेक्षा हिंदूंनी स्वतःचे ध्येय सध्या करावे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

टीप : ‘पॅन इस्लामवाद’ हे एक राजकीय आंदोलन असून ते इस्लामी राज्याचे समर्थन करते.

मुंबई – काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांनी त्यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी केली आहे. या तुलनेकडे राजकीय नाही, तर धार्मिक दृष्टीने पहायला हवे. हे काँग्रेसच्या विचारधारेपुरते सूत्र नाही, तर तो एक ‘पॅन इस्लाम’चा अजेंडा आहे. पुस्तके, चित्रपट, कविता आदींच्या माध्यमातून ‘जिहादी चळवळ’ चालवण्याचा हा प्रकार आहे. हा काँग्रेसचा वैचारिक जिहादी आतंकवाद आहे. काँग्रेसची रणनीती हिंदुद्वेषावर आधारलेली आहे. काँग्रेसी नेत्यांनी मंदिरांमध्ये जाणे, नवरात्रीत उपवास करणे वगैरे या त्यांच्याकडून केल्या जाणार्‍या कृती निवडणुकीपुरत्या असतात. त्यामुळे अशा आरोपांवर स्पष्टीकरण देण्यापेक्षा हिंदूंनी स्वत:चे ध्येय साध्य करण्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन ‘सुदर्शन वाहिनी’चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले.

श्री. सुरेश चव्हाणके

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘काँग्रेसचा वैचारिक आतंकवाद’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते. यात सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील विचारवंत डॉ. यदु सिंह आणि समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया सहभागी झाले होते. या विशेष संवादाचा लाभ ३ सहस्र ८५ जणांनी घेतला. सूत्रसंचालन श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले.

जिहादी आक्रमण करणार्‍यांविषयी काँग्रेस का बोलत नाही ? – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांचे समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. आनंद जाखोटिया

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या अमेरिकेतील हिंदुविरोधी परिषदेतून आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुत्वाला संपवण्याचे कारस्थान चालू झाले आहे. हाच अजेंडा काँग्रेसवाले चालवत आहेत. याआधी काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् आणि सुशीलकुमार शिंदे यांनी कथित ‘भगवा आतंकवाद’ असल्याचा प्रचार केला आहे. आतापर्यंत २ लाख ९३ सहस्र ९०० लोक आतंकवादी आक्रमणांत मारले गेले आहेत. हे आक्रमण करणारे सर्व आतंकवादी हे जिहादी आहेत. असे असतांना आक्रमण करणारे सर्वजण काँग्रेसवाल्यांना मुनी वाटतात का ? त्याविषयी काँग्रेस का बोलत नाही ?

काँग्रेसकडून होणार्‍या आक्षेपार्ह वक्तव्यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ आंदोलन करण्यात आले. यामध्ये हातात फलक घेऊन काँग्रेसचा निषेध करण्यात आला, तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या विषयावर हिंदूंनी एकत्र येऊन ट्विटरवर ‘#Congress_Hates_Hindutva’ या नावाने चालवलेल्या ट्रेंडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात २० सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आले.

अन्य धर्मियांच्या ग्रंथांविषयी बोलण्याचे धाडस राहुल गांधी का दाखवत नाहीत ? – डॉ. यदु सिंह, सिडनी, ऑस्ट्रेलिया

डॉ. यदु सिंह

हिंदु धर्मग्रंथांचा संदर्भ देऊन हिंदुत्व आणि हिंदु धर्म हे निराळे असल्याचे राहुल गांधी यांचे विधान केवळ हास्यास्पदच नाही, तर आपण काय बोलतो, हे त्यांनाही कळलेले नाही. ‘बोको हराम’ आणि ‘इसिस’ या आतंकवादी संघटनांशी हिंदुत्वाची तुलना होऊच शकत नाही. अशा विधानांचे समर्थन केल्यामुळेच काँग्रेसचा पराभव होत आहे. ‘मारा, कापा आणि बाटवा’, हे शिकवणार्‍या अन्य धर्मियांच्या ग्रंथांविषयी बोलण्याचे धाडस राहुल गांधी का दाखवत नाहीत ?

____________________________________________________________________________________________

‘काँग्रेस का वैचारिक आतंकवाद’ हा ‘ऑनलाईन’ विशेष संवाद ! पाहण्यासाठी येथे क्लिक करा !
______________________________________________________

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *