Menu Close

मालेगाव, अमरावती आणि नांदेड येथील दंगलींत हात असलेल्या ‘रझा अकादमी’वर बंदी घाला !

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी 

  • दंगलींची निवृत्त न्यायाधिशांद्वारे चौकशी करण्याची मागणी

वेंगुर्ले येथे तहसीलदार प्रविण लोकरे यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

सिंधुदुर्ग – त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसतांना मशीद पाडल्याची बातमी सामाजिक माध्यमांतून प्रसारित करून महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती आणि नांदेड येथे नुकत्याच दंगली करण्यात आल्या. १५ ते ४० सहस्र लोकांचा जमाव रस्त्यावर उतरून त्यांनी दुकाने, कार्यालये, गाड्या यांची हानी केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी, तसेच ‘या दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घालावी’ आदी मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ आदी ठिकाणी भाजप आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी २२ नोव्हेंबर या दिवशी धरणे आंदोलन केले. या वेळी विविध मागण्यांचे मुख्यमंत्री यांना द्यायचे निवेदन स्थानिक पातळीवर तहसीलदारांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की,…

१. जमावाने केलेल्या हिंसाचाराची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून प्रामुख्याने अमरावतीमध्ये लोक रस्त्यावर उतरले. त्यांच्यावरही हल्ले केले गेले. त्यानंतर पोलीस यंत्रणेकडून पक्षपाती पद्धतीने कारवाई केली जात आहे.

२. मालेगाव, अमरावती आणि नांदेड येथे अफवा पसरवून अन् धार्मिक भावना भडकवून दंगल घडवणारे सूत्रधार आणि त्यांचे समर्थक यांना अटक केली पाहिजे.

३. स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावी. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर पूर्वग्रहातून होत असलेली कारवाई थांबवावी आणि त्यांच्यावर नोंद झालेले गुन्हे मागे घ्यावेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *