Menu Close

ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास मुलगा होईल’, असे आमीष दाखवून ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदु कुटुंबाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न

गावकर्‍यांनी ख्रिस्ती मिशनर्‍यांना पकडून ठेवले; परंतु पोलिसांनी सोडून दिले !

  • ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विरोधात जागृत आणि संघटित असणार्‍या गावकर्‍यांचे अभिनंदन ! देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्यामुळेच अजूनही मिशनर्‍यांचे फावते आहे. हे पहाता केंद्र सरकारने लवकरात लवकर कायदा करणे आवश्यक आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • हिंदूंना फसवून त्यांचे धर्मांतर करणार्‍यांवर स्वतः कारवाई करायची नाही आणि गावकर्‍यांनी पकडून ठेवले, तर त्यांची सुटका करायची, हा पोलिसांचा हिंदुद्वेष अन् ख्रिस्तीप्रेम आहे, असे समजायचे का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

धर्मांतर

रामगड (झारखंड) – ‘ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास मुलगा होईल’, असे आमीष दाखवून ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदु कुटुंबाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. येथील गंझूडीह टोला गावात रहाणारे करमा करमाली यांना ४ मुली होत्या आणि त्यांना ‘मुलगा जन्माला यावा’, अशी अपेक्षा हाती. ख्रिस्ती मिशनर्‍यांनी त्याला ‘तुम्ही खिस्ती बनल्यावर मुलगा जन्माला येईल’, असे सांगून त्यांना धर्मांतरासाठी बाध्य केले. त्यांच्या कुटुंबाचे धर्मांतर करण्यासाठी ६ ख्रिस्ती मिशनरी गावात आले होते. याची माहिती मिळताच गावकर्‍यांनी या मिशनर्‍यांना पकडून ठेवले. पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्यांची सुटका केली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *