Menu Close

दहशतीचे वातावरण निर्माण करणार्‍या ‘रझा अकादमी’ या संघटनेवर बंदी घाला ! – शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेची मागणी

सिंधुदुर्ग – त्रिपुरा राज्यात धार्मिक स्थळे पाडल्याच्या अफवेवरून कथित घटनांच्या निषेधार्थ ‘रझा अकादमी’ या संघटनेच्या धर्मांधांनी महाराष्ट्र राज्यातील भिवंडी, अमरावती, मालेगाव आणि नांदेड येथे मोर्चे काढले. या मोर्च्यांना हिंसक वळण लागले आणि त्या ठिकाणी हिंदूंची दुकाने फोडली गेली, तसेच रस्त्यावरील वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे ‘रझा अकादमी’ या संघटनेवर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी येथील शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

या वेळी यशवंत भालेकर, सुमित राणे, विवेक सावंत, प्रथमेश सावंत, हार्दिक शिंगले, भूषण शेलटे, सुशील सावंत, प्रसाद नातू, माधवजी भानुशाली, संदीप कांबळी, किशोर सरनोबत, शुभम गवारे आणि रमाकांत नाईक आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *