यात्रा समितीलाच पाण्याची व्यवस्था करण्याचा सल्ला !
हिंदुबहुल भारतात हज यात्रेकरूंना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, तर हिंदूंच्या यात्रांना पाण्यासारख्या मूलभूत सोयीसुविधाही पुरवल्या जात नाहीत, हे लक्षात घ्या ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
बेळगाव : येळ्ळूर येथे २ मेपासून चालू होणार्या ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीच्या यात्रेच्या काळात टँकरने पाणीपुरवठा करण्यास स्थानिक प्रशासनाने नकार दिला आहे. (प्रशासनाने अन्य पंथियांच्या धार्मिक उत्सवांच्या संदर्भात असा नकार दिला असता का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही येळ्ळूर गावची ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
२. तथापि बेळगाव जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून सर्वत्र टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत यात्रेसाठी पिण्याचे पाणी कुठून आणणार, असा प्रश्न ग्रामस्थांना भेडसावत आहे.
३. यात्रेच्या काळात गावात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष आणि सदस्य यांंच्या वतीने तहसीलदारांना नुकतेच देण्यात आले होते.
४. तहसीलदार प्रीतम नसलापुरे यांनी येळ्ळूर ग्रामपंचायत विकास अधिकारी आणि सचिव यांना बोलावून, जिल्ह्यात सर्वत्रच पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने केवळ पिण्याकरिता पाणीपुरवठा करण्याचा आदेश राज्यशासनाने दिला आहे. यामुळे यात्रेकरता पाणीपुरवठा करता येणार नाही. यात्राकाळात टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी यात्रा समितीनेच व्यवस्था करावी, असे सांगितले.
५. यामुळे आता यात्रा समितीलाच गावात टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे.
६. जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईची समस्या भेडसावत असतांना विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार्या मंत्री आणि नेतेमंडळी यांच्या कार्यक्रमांना मात्र पाणीपुरवठा करण्यात येतो. मग अशा कार्यक्रमांना पाणीपुरवठा करण्याची तरतूद कायद्यात आहे का ? असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मुळातच येळ्ळूर हे मराठी भाषिक आणि सीमालढ्यातील अग्रेसर गाव असल्याने या गावावर सातत्याने अन्याय करण्यात येत असल्याची भावनाही व्यक्त करण्यात येत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात