व्यापारी, व्यावसायिक, हिंदुत्वनिष्ठ, तसेच अन्य मान्यवर यांचा उत्स्फूर्त आणि कृतीशील सहभाग
सातारा – हलाल उत्पादनांतून लाभ मिळवून तो इस्लामिक बँकेद्वारे उत्पादनांच्या वाढीसाठी उपयोगात आणला जात आहे, तसेच हलाल उत्पादने बनवणार्यांना अर्थसाहाय्य उपलब्ध करून देणे आणि जागतिक स्तरावरील बाजारपेठांवर नियंत्रण मिळवण्याचा ‘हलाल प्रमाणपत्रा’द्वारे प्रयत्न करणे, हे मोठे जागतिक षड्यंत्र आहे. अशा हलाल प्रमाणपत्राविषयी हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी संपर्क अभियानाद्वारे जनजागृती केली. या अभियानामध्ये व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक, हिंदुत्वनिष्ठ, हिंदु धर्माभिमानी असे समाजातील सर्व प्रकारचे घटक सहभागी झाले होते. या अभियानामध्ये अनेकांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरोधात सक्रीय सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली. या संदर्भातील विश्लेषण पुढे दिले आहे.
वाई
१. येथील व्यापारी श्री. ढाकणे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या वेळी वाई येथील प्रथितयश व्यापारी बैठकीसाठी उपस्थित होते. या वेळी उपस्थित व्यापारी बंधूंनी ‘हलाल प्रमाणपत्र’ असणार्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा संकल्प केला.
२. येथील भगवा कट्टा या सभागृहामधील बैठकीमध्ये वाई, पाचवड, भुईंज येथून व्यापारी, डॉक्टर, धर्माभिमानी हिंदु सहभागी झाले होते. या वेळी उपस्थितांनी समाजात जाऊन हलाल उत्पादनांविषयी जागृती करू, तसेच व्यापार्यांना हलाल उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यास सांगू, असे आश्वासन दिले, तसेच या विषयी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांना निवेदन देण्यास सांगणार असल्याचे, आश्वासनही दिले. ही बैठक आयोजित करण्यासाठी श्री. अतुल जाधवराव यांनी विशेष परिश्रम घेतले.
रहिमतपूर
येथील मुक्ताई मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत गावातील ३७ हून अधिक दुकानदार, व्यापारी, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी विषय समजून घेत निवेदन देणार असल्याचे सांगितले, तसेच गावोगावी बैठका आयोजित करणार असल्याचे सांगितले.
जांब
जांब येथील श्री. अनिकेत शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पंचक्रोशीतील किकली, पिंपोडे ब्रुद्रुक, राऊतवाडी, कालंगवाडी, सर्कलवाडी पळशी आदी गावांतील धर्माभिमानी हिंदू सहभागी झाले होते. या वेळी उपस्थित धर्माभिमान्यांनी निवेदन देणे, पंचक्रोशीतील गावांमध्ये बैठकांचे आयोजन करणे, हलाल उत्पादनांची विक्री थांबवण्यासाठी प्रबोधन करणे आदी गोष्टी करण्याचा संकल्प केला.
पाचवड
येथील सह्याद्री मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी व्यापारी आणि हिंदु धर्माभिमानी यांची बैठक पार पडली. या वेळी पाचवड आणि भुईंज येथील व्यापारी अन् हिंदु धर्माभिमानी यांची उपस्थिती होती. या वेळी श्री. महेश (नाना) गायकवाड यांनी व्यापार्यांना एकत्र करून निवेदन देणार असल्याचे सांगितले.
सातारा शहर
१. येथील हिंदु महासभेचे कार्यकारणी सदस्य श्री. उमेश गांधी यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या वेळी हिंदु महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि धर्माभिमानी सहभागी झाले होते. हिंदु महासभेच्या वतीने हलाल प्रमाणपत्राच्या विरोधात निवेदन देणार असल्याचे हिंदु महासभेचे सातारा जिल्हप्रमुख श्री. धनराज जगताप यांनी सांगितले.
२. श्री नटराज मंदिर येथील सभागृहामध्ये पार पडलेल्या बैठकीत धर्माभिमानी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते आणि श्री योग वेदांत सेवा समितीचे साधक उपस्थित होते. बैठकीतील धर्माभिमानी श्री. घाडगे यांनी निवेदन देणे आणि बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने निवेदन देणार असल्याचे सांगितले. श्री योग वेदांत सेवा समितीने सेवा म्हणून बैठकीसाठी ‘ऑडिओ सिस्टीम’ उपलब्ध करून दिली.
३. कूपर कॉलनीतील आधुनिक वैद्य सचिन साळुंखे यांना संपर्क करण्यात आला. साळुंखे हे सातारा जिल्हा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत. या वेळी ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात व्यापार्यांचे प्रबोधन करून निवेदन देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.