Menu Close

नेवासा (नगर) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून धर्मांतराचा प्रयत्न !

हिंदु धर्माला साजेशी अशी नावे देत कार्यक्रमाचे आयोजन करत धर्मांतराचा कुटील हेतू साध्य करू पहाणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांना वेळीच खडसवा !

नगर – येथील नेवासा तालुक्यात ख्रिस्त्यांकडून नुकतेच एका मोठ्या कार्यक्रमाचे गुप्तपणे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून धर्मांतराचा प्रयत्न झाला असल्याची शंका हिंदुत्वनिष्ठांकडून व्यक्त केली जात आहे. कार्यक्रमाच्या हस्तपत्रकात ख्रिस्ती बिशपला ‘प.पू. महागुरु’ असे संबोधण्यात आले होते, तर हिंदु देवी-देवतांच्या यात्रेप्रमाणे या कार्यक्रमाला ‘यात्रा सोहळा’ असे नाव देण्यात आले होते. कार्यक्रमात शेवटच्या सत्रात ‘भजन-कीर्तना’चा कार्यक्रमही ठेवण्यात आला होता. काही स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी कार्यक्रमाला जाण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना रोखण्यात आले. कार्यक्रमासाठी आत जाणार्‍या लोकांचे भ्रमणभाषही काढून घेण्यात आले होते. (एवढी गुप्तता पाळण्यामागील कारण हिंदूंनाही समजले पाहिजे. हिंदूंनो, यामागे काय गौडबंगाल आहे, ते समजेपर्यंत पोलीस प्रशासनाचा पाठपुरावा घ्या ! – संपादक)

या कार्यक्रमाची छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली आहेत. त्या छायाचित्रांमधून अनेकांकडून सामाजिक अंतर न पाळणे, मुखपट्टीचा (‘मास्क’चा) वापर न करणे असे प्रकार झाल्याचे समोर आले आहेत. ‘नगर जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढले असतांना अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करून कोरोनाचा प्रसार झाल्यास त्याला कार्यक्रमाचे आयोजक उत्तरदायी रहातील का ?’ असा प्रश्‍न स्थानिकांना पडला आहे. ‘या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पोलीस अनुमती घेण्यात आली होती का ?’ याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहरांनी नेवासा पोलिसांच्या विशेष शाखेकडे चौकशी केल्यानंतर ‘याविषयी माहिती घेऊन कळवतो’, असे सांगण्यात आले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *