फरिदाबाद (हरियाणा) – येथील बल्लभगडमध्ये बांधण्यात आलेली अवैध मजार (इस्लामी पीर किंवा फकिर यांची समाधी) हिंदुत्वनिष्ठांनी रात्रीच्या वेळी तोडून टाकली. येथे त्यांना लैंगिक संबंधांशी संबंधित, तसेच महिलांचे वशीकरण करण्याविषयीची औषधे सापडली. ही मजार येथील बल्लभगड पंचायत भवनच्या भूमीवर बांधण्यात आली होती. या मजारला ‘बाबा भूरेशाह की मजार’ असे नाव देण्यात आले होते. यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या मजारचा मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) अब्दुल गफार होता. तो हिंदु महिलांना भूलवण्यासाठी स्वतःचे नाव ‘बबली’ सांगत होता. तोडफोडीनंतर पोलिसांनी या मौलवीला कह्यात घेतले आहे. हिंदु संघटनांनी यापूर्वीच या मजारवर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले होते. तसेच येथे मंदिर बांधण्याची मागणी केली होती.
बल्लभगढ़ के ‘अवैध मजार’ में मिली सेक्स वर्धक, वशीकरण की दवाएँ, वाशरूम में देवी-देवताओं की तस्वीरें: मौलवी गफ्फार गिरफ्तार#Haryana https://t.co/PbP1wRIB9P
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 23, 2021