‘श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती आंदोलन समिती’ची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्णजन्मभूमी स्थानावरील ईदगाह मशीद ही भगवान श्रीकृष्णाच्या मूळ गर्भगृहावर बांधण्यात आली आहे. औरंगजेबने येथील श्रीकृष्ण मंदिर पाडून ईशगाह मशीद बांधली, तेव्हापासून येथे कधीही नमाजपठण करण्यात आले नाही; मात्र गेल्या काही दिवसांपासून येथे दिवसातून ५ वेळा नमाजपठण केले जात आहे. असे करून येथील सौहार्द जाणीवपूर्वक बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे येथे होणारे नमाजपठण बंद करावे, अशी मागणी करणारे निवेदन ‘श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती आंदोलन समिती’चे अध्यक्ष अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह यांनी जिल्हाधिकार्यांना दिले. या वेळी महामंडलेश्वर चित्त प्रकाशनानंद , सच्चिदानंद दास, देवानंद महाराज, सुरेशानंद परम हंस, स्वामी ब्रह्मचैतन्य मनमोहनदास, प्रदीपानंद महाराज, अधिवक्ता संगीता शर्मा आणि जितेंद्र सिंह उपस्थित होते.
‘श्रीकृष्ण मंदिर पर बने ईदगाह मस्जिद में नमाज पढ़ने पर लगे रोक, मंदिर के चिह्नों को मिटा रहे मुस्लिम’: DM को हिंदू पक्ष ने लिखी चिट्ठी#Mathura https://t.co/XaadaGohW6
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 25, 2021
अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह म्हणाले की, औरंगजेबाने श्रीकृष्ण मंदिराची ईदगाह मशीद केल्यानंतरही तेथील भिंतींवर आतापर्यंत शंख, चक्र आदी चिन्हे स्पष्ट दिसत होती; मात्र आता मुसलमानपक्ष जाणीवपूर्वक ही चिन्हे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठीच येथे होणारे नमाजपठण रोखणे आवश्यक आहे.
६ डिसेंबरला ईदगाह मशिदीमध्ये जाऊन भगवान श्रीकृष्णाचा अभिषेक करणार !
दुसरीकडे अखिल भारत हिंदु महासभेने येत्या ६ डिसेंबरला ईदगाह मशिदीमध्ये जाऊन भगवान श्रीकृष्णाचा अभिषेक करण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे कोणत्याही तोडफोडीविना आणि शांततेच्या मार्गाने हा अभिषेक करण्यात येईल, असे हिंदु महासभेने स्पष्ट केले आहे.