Menu Close

नाशिक येथे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्या जनसंपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’चा प्रसार !

१. आमदार श्री. राहुल ढिकले यांना ‘सनातन पंचाग २०२२’ भेट देतांना श्री. सुनील घनवट, श्री. गौरव जमधडे, श्रीमती वैशाली कातकडे

नाशिक – हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी नाशिक जिल्ह्यात विविध प्रतिष्ठितांच्या भेटी घेतल्या. या वेळी सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियानाचा’ही प्रसार करण्यात आला. या वेळी प्रतिष्ठितांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

ग्रंथांची मोठी मागणी मिळवून देऊ ! – गुरुनाथ कांदे, पिंपाळगाव बाजार समिती सदस्य

श्री. घनवट यांनी येथील माजी जिल्हा पंचायत समिती सदस्य, तसेच पिंपाळगाव बाजार समिती सदस्य आणि बांधकाम व्यावसायिक श्री. गुरुनाथ कांदे यांची भेट घेतली. त्यांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्य जाणून घेतले. सनातनच्या ग्रंथांचे महत्त्व लक्षात आल्यावर ‘संपर्कातील आमदार, बाजार समिती सदस्य आणि पतसंस्था यांच्याकडून ग्रंथांची मागणी मोठ्या प्रमाणात स्वतः मिळवून देऊ’, असे त्यांनी सांगितले आणि समाजातील अन्य प्रतिष्ठित व्यक्तींचे संपर्क दिले.

  • भाजपचे नगरसेवक श्री. मच्छिंद्र सानप यांची भाजप उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख म्हणून निवड झाल्याविषयी त्यांची भेट घेऊन श्री. घनवट यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि ‘सनातन पंचांग २०२२’ भेट दिले.
  • श्री. घनवट यांनी तिरूपति हॉस्पिटलचे डॉ. संदीप मंडलेचा यांची भेट घेऊन त्यांना ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’विषयी माहिती दिली, तेव्हा त्यांनी त्यांच्याकडील संपर्क अभियानासाठी दिले आणि समितीच्या कार्यासाठी साहाय्य करण्याची सिद्धता दाखवली.

हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात जागृती करू ! – राहुल ढिकले, आमदार, भाजप

भाजपचे आमदार श्री. राहुल ढिकले यांची श्री. सुनील घनवट यांनी भेट घेतल्यावर श्री. घनवट यांची श्री. ढिकले यांनी अतिशय आपुलकीने चौकशी केली. ग्रंथ अभियानाविषयी कळल्यावर त्वरित आमदार निधीतून त्यांनी निधीविषयी शिफारस पत्र दिले. या वेळी त्यांनी हलाल अर्थव्यवस्थेच्या दुष्परिणामांविषयी जाणून घेतले आणि ‘याविषयी समाजात जागृती करू’, असेही सांगितले. त्यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *