Menu Close

गुरुग्राम (हरियाणा) येथे प्रशासनाने नमाजपठणाला दिलेल्या अनुमतीला विरोध

नमाजपठणाच्या जागेवर स्थानिकांकडून हवन

स्थानिकांचा विरोध असतांना प्रशासन सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाला अनुमती कशी देते ? हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशी अनुमती कशी मिळते ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

गुरुग्राम (हरियाणा) – येथे गेल्या काही मासांपासून सार्वजनिक जागेवर शुक्रवारचे नमाजपठण करण्यास देण्यात आलेल्या अनुमतीला स्थानिक हिंदूंकडून विरोध केला जात आहे. २६ नोव्हेंबरला येथील सेक्टर ३७ मध्ये ज्या ठिकाणी नमाजपठण करण्यात येणार होते, तेथे हिंदूंनी हवन चालू केल्याने नमाजपठण करण्यास आलेल्यांना परत जावे लागले. तथापि काही वेळाने हाजी शहजाद यांच्या उपस्थितीत २५ जणांनी हवनाच्या जागेपासून थोड्या अंतरावर एका कोपर्‍यात नमाजपठण केले. त्या वेळी स्थानिकांकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. हवनाविषयी हिंदूंचे म्हणणे होते की, मुंबईतील २६ नोव्हेंबर २००८ च्या आतंकवादी आक्रमणात मृत्यू पावलेल्यांसाठी आम्ही हे हवन केले. प्रत्येक वर्षी असे हवन केले जाते. या वेळी आम्ही या जागेवर हवन केले.

१. हवनला उपस्थित असलेले ‘जय भारतमाता वाहिनी’चे संस्थापक दिनेश ठाकूर या वेळी म्हणाले की, उघड्यावर नमाजपठण करण्याला आम्ही विरोध करत आहोत. यासाठीच आम्ही येथे आलो असून याची माहिती प्रशासनाला यापूर्वीच दिली आहे.

२. नमाजपठणाला झालेल्या विरोधाविषयी हाजी शहजाद म्हणाले की, प्रशासनाने आम्हाला नमाजपठण करण्याची अनुमती दिली असून  मुसलमान गेल्या काही वर्षांपासून येथे नमाजपठण करत आहेत. मग आता येथील वातावरण बिघडण्याचा प्रयत्न का केला जात आहे ?

३. ‘मुस्लिम एकता मंच’चे अल्ताफ अहमद म्हणाले की, गेल्या ३ मासांपासून नमाजपठणाला विरोध केला जात आहे. हे राज्यघटनेच्या कलम २५ चे उल्लंघन आहे. प्रशासनाने अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे.

गुरुद्वारामध्ये नमाजपठणासाठी कुणीही आले नाही !

या विरोधानंतर येथील ‘गुरुद्वारा कमेटी’कडून मुसलमानांना गुरुद्वारामध्ये नमाजपठण करण्याचे आमंत्रण देण्यात आले; मात्र २६ नोव्हेंबरला येथे कुणीही नमाजपठणासाठी आले नाही. (कोणत्याही मशिदीमध्ये हिंदू किंवा शीख यांना त्यांचा धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यासाठी कधी आमंत्रित केले जाते का ? मग ही एकतर्फी धर्मनिरपेक्षता कशाला ? – संपादक दैनिक सनातन प्रभात ) मुसलमानांकडून सांगण्यात आले की, आमची मशीद जवळच आहे. (जर मशीद जवळ आहे, तर ते एरव्ही सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण का करतात ? – संपादक दैनिक सनातन प्रभात) देहली येथील सरकार राजीव रंजन हे गुरुद्वारामध्ये त्यांच्या सहकार्‍यांह गेले होते. त्यांनी ‘शीख धर्मानुसार गुरुद्वारामध्ये नमादैनिक सनातन प्रभातजपठण करू देणार नाही’, अशी चेतावणी दिली. (धर्मानुसार आचरण करणारे सरदार राजीव रंजन यांचे अभिनंदन ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *