पाटलीपुत्र (बिहार) – बिहार राज्याच्या ‘धार्मिक न्यास मंडळा’ने राज्यातील सर्व सार्वजनिक मंदिरांना ४ टक्के कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या मंदिरांत जी मंदिरे खासगी आहेत; मात्र ती सर्वसामान्य लोकांसाठी खुली करण्यात आली आहेत, त्यांचाही समावेश आहे. या मंदिरांची नोंदणी करून त्यांनाही कर द्यावा लागणार आहे. १ डिसेंबरपासून सर्व मंदिरांचे नोंदणी अभियान चालू करण्यात येणार आहे. या मंडळाने राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांकडे नोंदणी नसलेल्या मंदिरांची माहिती मागवली आहे. बिहार राज्यात सध्या केवळ ४ सहस्र ६०० मंदिरांची नोंदणी करण्यात आली आहे. राज्यातील काही प्रमुख मंदिरांची नोंदणी करण्यात आलेली नाही.
मंदिरों को कराना होगा रजिस्ट्रेशन, देना होगा 4% टैक्स: बिहार के ‘धार्मिक न्यास बोर्ड’ का फैसला, माँगी गई मंदिरों की डिटेल#Bihar #HinduTempleshttps://t.co/QZlO5Xrf2R
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 28, 2021
या मंडळाचे सदस्य आणि महंत विजय शंकर गिरि यांचे म्हणणे आहे की, खासगी मंदिरांमध्ये बाहेरून लोक येऊन पूजा-अर्चा करतात, ती सर्व मंदिरे ‘सार्वजनिक मंदिरे’ म्हणून ओळखळी जातील. त्यांना नोंदणी करून कर द्यावा लागणार आहे.