Menu Close

खरगोन (मध्यप्रदेश) येथे ख्रिस्ती पंथ स्वीकारलेल्या २२ जणांनी पुन्हा स्वीकारला हिंदु धर्म !

(डावीकडे) घरवापसी करताना हिंदू (उजवीकडे) हिंदूंचे धर्मांतरण करताना ख्रिस्ती प्रचारक

खरगोन (मध्यप्रदेश) – येथे ३ नोव्हेंबर २०२१ या दिवशी २२ लोकांनी धर्मांतर करून ख्रिस्ती पंथ स्वीकारला होता, त्यांनी हिंदु धर्मामध्ये पुन्हा प्रवेश करून ‘घरवापसी’ केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत रसगाव मालपुरा येथील गावकरी विजय बडोले आणि त्याची आत्या बंजुला बडोले यांना अटक केली. या दोघांच्या साहाय्यानेच अरुणाचल प्रदेशातून आलेला ख्रिस्ती प्रचारक मारसन लाय याने २२ जणांचे धर्मांतर केले होते.  मारसन लाय हा पसार झाला. धर्मांतरासाठी मारसन याने गावातील मुलांना विनामूल्य शिक्षण देण्यासह विविध आमिषे स्थानिक लोकांना दाखवली होती. धर्मांतर करतांना त्याने २२ लोकांवर पाणी शिंपडून त्यांच्या गळ्यात ‘क्रॉस’ (ख्रिस्त्यांचे धार्मिक चिन्ह) घातला होता.

धर्मांतराच्या या घटनेची चित्रफीत माध्यमांवर प्रसारित झाली होती. यानंतर भाजपचे खासदार गजेंद्र सिंह पटेल यांनी खरगोनच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनीवरील कारवाई केली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *