Menu Close

हिंदु राष्ट्र प्रसार अभियान आणि ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियान’ यांना मुंबई जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा नुकताच मुंबई जिल्ह्यात संपर्क दौरा झाला. या वेळी आमदार, खासदार, अधिवक्ता, उद्योजक, तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या भेटी झाल्या. या वेळी सनातनच्या ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’विषयीही माहिती सांगितली. त्यातील काही भागाचा वृत्तांत येथे देत आहोत.

१. मंदिराच्या सरकारीकरणाला विरोध करणे आवश्यक ! – शरदचंद्र पाध्ये, विश्वस्त, महालक्ष्मी मंदिर, मुंबई.

मंदिराचे सरकारीकरण झाल्यावर मंदिराचे पावित्र्य नष्ट होऊन त्या ठिकाणी भ्रष्टाचार वाढतो. यासाठी मंदिराच्या सरकारीकरणाला विरोध करणे आवश्यक आहे. मंदिरे वाचवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या प्रयत्नांत आम्हीही सहभागी झालो होतो, असे वक्तव्य श्री. पाध्ये यांनी या वेळी केले.

या वेळी श्री. सुनील घनवट यांनी मंदिरांच्या रक्षणाविषयी समितीने केलेले कार्य, मिळालेले यश आणि त्याविषयीची ध्वनीचित्रचकती श्री. पाध्ये यांना दाखवली, तसेच ‘सनातन पंचांग २०२२’ भेट दिले. ज्ञानशक्ती प्रसार अभियानाच्या माध्यमातून सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथातून कसे कार्य होत आहे ?, याची माहितीही श्री. घनवट यांनी श्री. पाध्ये यांना या वेळी दिली. त्यानंतर श्री. पाध्ये यांनी महालक्ष्मी मंदिरासाठी सनातन संस्थेचे धर्म आणि साधना विषयक ग्रंथ घेतले.

 २. ग्रंथांच्या माध्यमातून १०० मंदिरांत धर्मज्ञान पोचवण्याचा संकल्प करणारे उद्योजक श्री. मनोज धोलानी !

दादर येथील श्री. मनोज धोलानी यांचा स्वयंपाकाची विविध यंत्र सिद्ध करून त्यांचे वितरण करण्याचा व्यवसाय आहे. भारतातील २०० मंदिरांत त्यांची भांडी आणि उपकरणे यांचे वितरण होते. त्यांनी सनातन संस्थेच्या आश्रमात भांडी अर्पण केली आहेत.  ‘मला वेळेअभावी सेवा करणे शक्य नाही; परंतु आश्रमात दिलेली भांडी सेवा करत आहेत याचा मला आनंद होत आहे,’ असे श्री. धोलानी यांनी श्री. सुनील घनवट यांनी घेतलेल्या भेटीच्या वेळी म्हटले. श्री. घनवट यांनी ज्ञानशक्ती प्रसार अभियानाची माहिती दिल्यानंतर श्री. धोलानी यांनी १०० मंदिरांत मंदिरविषयक प्रत्येकी ३ ग्रंथ पोचवण्याचा संकल्प केला.

३. छत्रपती शिवरायांनी ज्याप्रमाणे मावळ्यांना घडवले, तसे तुमच्या गुरूंनी साधकांना घडवले ! – प्रवीण कानविंदे, विश्वस्त, गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्ट, मुंबई.

श्री. प्रवीण कानविंदे यांना सनातनचे पंचांग भेट देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट

मी प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटलेलो नाही; पण छत्रपती शिवरायांनी ज्याप्रमाणे मावळ्यांना घडवले, त्याप्रमाणे तुमच्या गुरूंनी तुम्हा सर्व साधकांना घडवले आहे. या काळात सर्वस्वाचा त्याग करून तुम्ही सर्व धर्मकार्य करत आहात, हे कौतुकास्पद आहे, असे उद्गार श्री. प्रवीण कानविंदे यांनी काढले. या वेळी ‘हलाल प्रमाणपत्र’, ‘विशाळगड रक्षण मोहीम’, ‘जनसंख्या जिहाद’ आदी विविध विषयांवर चर्चा झाली. श्री. घनवट यांनी सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ची माहिती सांगितल्यानंतर श्री. कानविंदे यांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थेत सनातनच्या ग्रंथांचा संच देण्याचा निर्णय घेतला.

४. हिंदु जनजागृती समितीच्या ‘फेसबूक पेज’वर लादलेली बंदी अन्यायकारक ! – डॉ. अमित थडानी, शल्यचिकित्सक (सर्जन)

‘फेसबूक’ने कोणतेही कारण न देता हिंदु जनजागृती समितीच्या ‘फेसबूक पेज’वर घातलेल्या बंदीविषयी डॉ. अमित थडानी म्हणाले, ‘‘ही बंदी अन्यायकारक असून त्याविषयी तक्रार करणे आवश्यक आहे. भारतातील ‘फेसबूक’च्या प्रतिनिधीकडे या प्रकरणी शासनाच्या माध्यमातून दबाव आणणे आवश्यक आहे.’’ या वेळी डॉ. थडानी यांच्यासमवेत विशाळगड रक्षण मोहीम, इतिहासाचे विकृतीकरण, ‘लँड जिहाद’ अशा विविध विषयांवर चर्चा झाली. ‘‘ज्ञानशक्ती प्रसार अभियानाच्या अंतर्गत ग्रंथांचा अभ्यास करून कुठे-कुठे ग्रंथांचे वितरण करू शकतो ?’’, याचा अभ्यास करून त्याविषयी कळवतो, असे या वेळी डॉ. थडानी यांनी सांगितले.

५. समितीचे कार्य कौतुकास्पद ! – आमदार मंगलप्रभात लोढा, मुंबई प्रदेशाध्यक्ष, भाजप  

आमदार मंगलप्रभात लोढा यांना सनातनचे पंचांग भेट देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट

या भेटीत श्री. सुनील घनवट यांनी भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांना समितीच्या वतीने हिंदूंचे संघटन होण्यासाठी घेण्यात येत असलेले अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन, हिंदु राष्ट्र-जागृती सभा यांसह समितीच्या विविध कार्यांची माहिती दिली.  याविषयीची ध्वनीचित्रफीतही आमदार लोढा यांना दाखवली. या वेळी ‘समितीचे कार्य कौतुकास्पद आहे’, असे उद्गार लोढा यांनी काढले.

६. ज्ञानशक्ति प्रसार अभियानात सहकार्य करू ! – आमदार मंगेश कुडाळकर, कुर्ला पूर्व

‘ज्ञानशक्ति प्रसार अभियानात सहकार्य करू’, असे आश्वासन आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिले. या वेळी कुडाळकर यांना ‘सनातन पंचांग २०२२’ आणि दीपावलीचे शुभेच्छापत्रक श्री. घनवट यांनी दिले.

७. जनसंपर्काचा उपयोग करून धर्मकार्य वाढवणार ! – ऋत्विक औरंगाबादकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्ट, मुंबई.

‘‘धर्माचे कार्य वाढवणे आवश्यक आहे. माझ्याकडील जनसंपर्काचा उपयोग करून धर्मकार्य वाढवूया’’, असे प्रतिपादन श्री. ऋत्विक औरंगाबादकर यांनी या भेटीच्या वेळी केले. या वेळी विशाळगड रक्षण मोहीम, हलाल प्रमाणपत्र, बांगलादेशी मुसलमानांची घुसखोरी आदी विविध विषयांवर श्री. घनवट यांनी डॉ. ऋत्विक यांच्याशी चर्चा केली. या वेळी ज्ञानशक्ती प्रसार अभियानाच्या अंतर्गत ‘कुठे कुठे सनातनचे ग्रंथ वितरीत करता येतील ?, याचा अभ्यास करून ग्रंथ घेईन’, असे त्यांनी सांगितले.

८. हिंदूंमध्ये जागृती करणारी ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा आयोजित करण्यासाठी सहभाग घेण्याची राज्य सल्लागार प्रकाश चौधरी यांची सिद्धता !

राज्याचे सल्लागार, तसेच राज्य समन्वयक श्री. प्रकाश चौधरी यांच्या भेटीत  विशाळगड रक्षण मोहीम, बांगलादेश येथील हिंदूंवर होणारे अत्याचार, बांगलादेशी मुसलमानांची घुसखोरी या विषयांवर चर्चा झाली. हिंदूंमध्ये तेजाचे स्फुल्लिंग चेतवणार्‍या ‘हिंदु राष्ट्र जागृती सभांची फलनिष्पत्ती’ याविषयीची माहिती या वेळी श्री. घनवट यांनी दिल्यावर सभा आयोजित करण्यास सहमती दर्शवली. या वेळी ‘सनातन पंचांग २०२२’ आणि शुभेच्छापत्रक देण्यात आले. या वेळी ज्ञानशक्ती प्रसार अभियानाच्या संदर्भातही श्री. घनवट यांनी त्यांना अवगत केले.

९. अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात न्याय मिळेपर्यंत लढणार ! – अभिजित कुलकर्णी, हिंदुत्वनिष्ठ, कुर्ला 

अनधिकृत भोंग्यांचा आवाज आता मोठ्या प्रमाणावर वाढला असून या माध्यमातून सर्व हिंदूंना पुष्कळ त्रास सहन करावा लागतो. पोलीस सदर अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करत नाहीत, यासाठी आम्ही आता ‘रिट पिटिशन’ (या याचिकेच्या माध्यमातून न्यायालय सरकारला आदेश देऊ शकते.) प्रविष्ट केली असून न्याय मिळेपर्यंत लढणार असल्याचा निर्धार या वेळी श्री. कुलकर्णी यांनी व्यक्त केला. या संदर्भात लवकरच एकत्र बैठक घेऊ, असे या वेळी त्यांनी सांगितले.

१०. आदर्श भावी पिढी घडवण्यासाठी ज्ञानशक्ति प्रसार अभियानाद्वारे होणारे कार्य अतिशय चांगले ! – विजय चौगुले, माजी जिल्हाप्रमुख, शिवसेना, नवी मुंबई.

आदर्श भावी पिढी घडवण्यासाठी ज्ञानशक्ति प्रसार अभियानाद्वारे तुम्ही जे कार्य करत आहात ते अतिशय चांगले आहे, असे मत शिवसेनेचे विजय चौगुले यांनी व्यक्त केले.


देवतांचे विडंबन करणार्‍यांना कायदेशीर मार्गाने धडा शिकवणार ! – नरेंद्र पाटील, माजी आमदार, नवी मुंबई 

माजी आमदार नरेंद्र पाटील यांना सनातन पंचांग भेट देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट

मी माझ्या अधिवक्त्यांच्या माध्यमातून एक कायद्याचा मसुदा सिद्ध करत आहे. हा कायदा लागू झाल्यास देवतांचे विडंबन करणार्‍यांना कायदेशीर मार्गाने धडा शिकवता येईल, अशी माहिती या भेटीच्या वेळी माजी आमदार श्री. नरेंद्र पाटील यांनी दिली. या वेळी श्री. पाटील यांच्यासमवेत श्री. सुनील घनवट यांनी राष्ट्र आणि धर्म कार्याविषयी चर्चा केली. ज्ञानशक्ती प्रसार अभियानाच्या अंतर्गत ‘स्वत:च्या परिचयातील २० लोकांना ग्रंथांचा संच देईन’, असे श्री. पाटील यांनी या वेळी सांगितले.


सनातन संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित करण्यात आलेले ग्रंथ अतिशय उपयुक्त ! – सुरेश कुलकर्णी, माजी स्थायी समिती सभापती, माजी नगरसेवक, तुर्भे, नवी मुंबई महापालिका

श्री. सुरेश कुलकर्णी यांना सनातनचे पंचांग भेट देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट आणि अन्य कार्यकर्ते

सनातन संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित करण्यात आलेले ग्रंथ अतिशय उपयुक्त आहेत. आदर्श भावी पिढी घडवण्यासाठी याची आवश्यकता आहे. प्रभागातील शाळेत हे ग्रंथ संच ठेवून आपल्या कार्यात सहभागी होईन, असे मत श्री. सुरेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ‘देशातील प्राचीन मंदिरांचे महत्त्व कळावे, यासाठी प्रभागातील भाविकांना स्वखर्चाने प्रत्येक वर्षी विमानाने देवदर्शनाला नेतो’, असे सुरेश कुलकर्णी यांनी या वेळी सांगितले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *