Menu Close

भारतात ‘हलाल प्रमाणपत्रा’द्वारे समांतर अर्थव्यवस्था करण्याचा प्रयत्न होणे गंभीर !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यापारी, उद्योजक, धर्मप्रेमी आदींनी व्यक्त केले मत

हिंदु जनजागृती समितीचे मनोज खाडये यांच्या ‘सिंधुदुर्ग जनसंपर्क अभियाना’त हलाल प्रमाणपत्राच्या दुष्परिणामांविषयी प्रबोधन

आपापल्या स्तरावर प्रबोधन करण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार

कुडाळ येथील श्री. महेश गावडे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करतांना श्री. मनोज खाडये

सिंधुदुर्ग – हिंदूंचा व्यापार आणि अर्थव्यवस्था यांत हस्तक्षेप करून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ‘हलाल प्रमाणपत्र’ हे जागतिक षड्यंत्र आहे. या ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी जिल्ह्यात कुडाळ, मालवण, देवगड, कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडी येथे हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी संपर्क अभियानाद्वारे जागृती केली. या अभियानात उद्योजक, व्यापारी, शेतकरी, प्राध्यापक, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, हितचिंतक, ‘सनातन प्रभात’चे वाचक, पत्रकार अशा समाजातील विविध घटकांचा समावेश होता. विषय ऐकल्यावर सर्वांनीच ‘हा विषय गंभीर असून आम्ही आमच्या स्तरावर याविषयी जागृती करण्यासाठी प्रयत्न करतो’, असे सांगितले.

या संपर्क अभियानात श्री. खाडये यांनी ‘हलाल’ म्हणजे काय ?’, ‘हलाल प्रमाणपत्र’ म्हणजे काय ?’, ‘त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणते दुष्परिणाम होणार आहेत ?’ आदी सूत्रांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी सनातनचे संत सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती.

‘हलाल’ या मूळ अरबी शब्दाचा अर्थ इस्लामनुसार वैध आहे. मूलत: मांसाच्या संदर्भातील ‘हलाल’ची मागणी आता शाकाहारी खाद्यपदार्थांसह सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुणालये, गृहनिर्माण संस्था अशा अनेक गोष्टींत केली जात आहे. निधर्मी (सेक्युलर) भारतात सरकारच्या ‘अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ म्हणजे FSSAI कडून प्रमाणपत्र घेतल्यावर हे खासगी इस्लामी प्रमाणपत्र घेण्याची सक्ती का ?, असा प्रश्‍न श्री. खाडये यांनी या वेळी उपस्थित केला.

देवगड येथे उद्योजकांना हलाल प्रमाणपत्राच्या दुष्परिणामांचा विषय सांगतांना श्री. मनोज खाडये

मार्गदर्शनानंतर उपस्थितांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया

१. श्री संदीप तळवडेकर, सुवर्णकार – आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देतो.

२. श्री. हृदयनाथ लक्ष्मण गावडे आणि सौ. ऋतुजा हृदयनाथ गावडे, प्राथमिक शिक्षक, कुडाळ – याविषयी विद्यार्थ्यांच्या पालकांचे प्रबोधन करू.

३. सौ. चैत्राली अविनाश पाटील, प्राथमिक शिक्षक – याविषयी शाळेशी संबंधित पालकांचे, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला शाखेत महिलांना माहिती देऊन प्रबोधन करणार आहोत.

४. सौ. शीतल गोसावी, प्राथमिक शिक्षक – याविषयी शाळेशी संबंधित पालकांचे प्रबोधन करणार.

५. श्री. आनंद बांदिवडेकर, कुडाळ – सध्याच्या काळात राष्ट्र आणि धर्म यांसाठी हिंदु जनजागृती समिती उत्कृष्ट कार्य करत आहे. या कार्यात आम्ही नेहमी तुमच्यासमवेत आहोत. आपले संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न करूया.

६. डॉ. नितीन पावसकर, कुडाळ – आपले कार्य चांगले आहे. हा विषय अधिकाधिक जणांपर्यंत पोचवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करूया.

७. श्री. कुणाल वरसकर, वेंगुर्ले – हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे. मी माझ्या हिंदुत्वनिष्ठ मित्रांना धर्माच्या कार्यासाठी संघटित करण्यासाठी प्रयत्न करतो.

देवगड आणि मालवण येथील व्यापार्‍यांचा कृतीशील सहभाग

श्री. मनोज खाडये यांचे मार्गदर्शन ऐकल्यानंतर देवगड आणि मालवण येथील व्यापारी बांधवांनी तहसीलदारांच्या द्वारे केंद्र सरकारला ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था बंद करण्याविषयी निवेदन दिले. देवगड येथे निवेदन देतांना तालुका मोटार चालक-मालक संघटनेचे खजिनदार श्री. सुधीर मांजरेकर, देवगड तालुका भंडारी समाज मंडळाचे सचिव श्री. सुनील रघुनाथ बिर्जे, जामसंडे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष श्री. संतोष किंजवडेकर, जामसंडेचे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. माधव कुलकर्णी, तळेबाजार येथील धर्माभिमानी श्री. सत्यवान परब, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद मोंडकर, श्री. अशोक करंगुटकर आणि श्री. भास्कर खाडिलकर उपस्थित होते. मालवण येथे सर्वश्री राजेश वळंजू, मोहन पटेल, पंकज पेडणेकर, अशोक ओटवणेकर, जगदीश पटेल, धनसुख पटेल, नरसिंह पटेल आदी व्यापारी बांधव उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *