|
बेंगळुरू (कर्नाटक) – येथील वसंतनगरामधील कँटोनमेंट रेल्वे स्थानकापासून २०० मीटर अंतरावर असलेले श्री चामुंडेश्वरी देवस्थान अनधिकृत ठरवून पाडण्यासाठी आलेल्या रेल्वेच्या अधिकार्यांच्या विरोधात हिंदू संघटनांनी आंदोलन केले. त्यानंतर रेल्वे अधिकार्यांनी ‘मंदिर पाडणार नाही’, असे आश्वासन दिले आणि ते परत गेले. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा, सामाजिक कार्यकर्त्या सौ. मंगला गौरी, देवस्थानचे श्री. कृष्णमूर्ती, बजरंग दलाचे श्री. पुनित कुमार, हिंदु महासभेचे श्री. सुरेश जैन, तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१. सकाळी ११ वाजता रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस त्या ठिकाणी आले. त्या वेळी त्यांना हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी तीव्र विरोध केला.
२. श्री. मोहन गौडा या वेळी म्हणाले की, हे मंदिर ५० वर्षे जुनेे आहे. त्याचे विश्वस्त रेल्वे अधिकारीच आहेत. येथे प्रतिदिन पूजा होत असते. मानचित्रामध्ये (नकाशामध्ये) या स्थानाचा ‘देवस्थानाची भूमी’ असा उल्लेख आहे. येथे विद्युत् व्यवस्था आहे. काही प्रमाणपत्रे आहेत; म्हणून ते कोणत्याही कारणाने पाडण्यात येऊ नये. पाडण्याच्या प्रयत्नाला आमचा तीव्र विरोध आहे. मंदिराचे संरक्षण केले पाहिजे. मंदिर वाचवण्यासाठी आम्ही कायदेशीर लढा देऊ.
HJS & devout Hindus protested against demolition of 50 year old Sri Chamundeshwari Temple opp Cant Railway Station Bengaluru
Rly authorities had served notice to temple trustee to vacate Temple to build multi storey building
Authorities Relented after strong protest –@Mohan_HJS pic.twitter.com/uwWpkhZob6
— HJS Bangalore (@HJSBangalore) November 29, 2021
३. हिंदूंकडून या वेळी सांगण्यात आले की, ही जागा पूर्वी केळदीच्या राजांनी नीलकंठ देशी केंद्र मठाला दिली होती. त्या संदर्भातील प्रमाणपत्रे आहेत. या देवालयात गत ५० वर्षांपासून नवरात्र उत्सव, अमावास्येला अन्नदान इत्यादी केले जाते. रेल्वे विभागानेच येथे देवालय बांधण्याची अनुमती दिली होती. या मंदिरामुळेे जनसामान्यांना, रस्त्याला आणि रेल्वेला कोणताही अडथळा नाही. त्यामुळे ते वैध असल्याचे घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली.