|
भाग्यनगर – आंध्रप्रदेमधील श्रीशैलम् येथील ‘श्रीशैलम् भ्रमराम्बिका मल्लिकार्जुन स्वामी मंदिरा’च्या परिसरातील अन्य धर्मियांची दुकाने रिकामी करावीत आणि यापुढे होणार्या सार्वजनिक लिलावात या स्थानी अन्य धर्मियांना जागा देण्यात येऊ नये, असा स्पष्ट निर्णय आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने नुकताच दिला. या मंदिराच्या परिसरात अन्य धर्मियांच्या असणार्या १७६ दुकानांना ‘ललितम्भिका कॉम्पलेक्स’ येथे जागा द्यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयाची त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी ‘हैंदव संघाल ऐक्य वेदिके’ने (‘संयुक्त कृती समिती’ने) एका पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेमध्ये हिंदु जनजागृती समितीचाही सहभाग होता.
या पत्रकार परिषदेला संबोधित करतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन गाडी म्हणाले की, श्रीशैलम् हे तीर्थक्षेत्र १८ शक्तिपिठांपैकी एक आणि १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. इतक्या पवित्र तीर्थक्षेत्री अन्य धर्मियांचा प्रभाव असणे, ही अतिशय दु:खद गोष्ट आहे. अन्य धर्मियांनी वर्ष २०१५ आणि २०१७ मध्ये अशा प्रकारच्या निर्णयांना उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ही दोन्ही प्रकरणे रहित करतांना उच्च न्यायालयाने वरील निर्णय दिला. तथापि न्यायालयाने इतका स्पष्ट निर्णय देऊनही मंदिराच्या कार्यकारी अधिकार्याने या निर्णयाची कार्यवाही का केली नाही ? हा न्यायालयाचा अवमान नव्हे का ? त्यामुळे आत तरी न्यायालयाच्या निर्णयाची कार्यवाही करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
या पत्रकार परिषदेत हिंदु जनजागृती समितीसह हिंदु देवालय परिरक्षण समिती, राष्ट्रीय शिवजी सेना, हिंदु जनशक्ती, हरे राम हरे कृष्ण फाऊंडेशन आणि ऋषी जीवन समाज या संघटना सहभागी झाल्या होत्या.