Menu Close

मध्यप्रदेशमध्ये ‘ज्ञानशक्ती संपर्क अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या वतीने सनातनची व्यक्तीमत्त्व विकास, बालसंस्कार, आयुर्वेद आदी विविध विषयांवरील प्रकाशित अनमोल ग्रंथसंपदा जनमानसापर्यंत पोचवण्यासाठी मध्यप्रदेशमध्ये ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाला महाकालनगरी उज्जैनपासून प्रारंभ करण्यात आला. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यामध्ये उज्जैन, इंदूर आणि भोपाळ येथील विद्यालयांपर्यंत ग्रंथसंपदा पोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि विद्यालये यांना संपर्क करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया आणि सनातनचे साधक अन् समितीचे कार्यकर्ते यांनी मान्यवरांच्या भेटी घेतल्या. याविषयीचा संक्षिप्त वृत्तांत…

१. संस्कृतीमुळेच राष्ट्र जिवंत राहू शकते !- माजी खासदार डॉ. सत्यनारायण जटिया, भाजप

उज्जैन येथे ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत भाजपचे माजी खासदार डॉ. सत्यनारायण जटिया यांची भेट घेण्यात आली. या वेळी डॉ. जटिया म्हणाले, ‘‘संस्कृतीमुळेच राष्ट्र जिवंत राहू शकते. त्यामुळे संस्कृती संवर्धनासाठी करण्यात येणारा प्रत्येक प्रयत्न महत्त्वपूर्ण आहे. सनातन संस्थेची ग्रंथसंपदा विद्यालयांमध्ये उपलब्ध करण्यासाठी मी माझ्या खासदार मित्रांच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न करीन.’’

२. भाजपचे खासदार अनिल फिरोजिया यांची घेण्यात आली भेट !

भाजपचे खासदार श्री. अनिल फिरोजिया यांची भेट घेऊन अभियानाविषयी चर्चा करण्यात आली. या वेळी ते म्हणाले, ‘‘मला खासदार निधी मिळाल्यानंतर माझ्या क्षेत्रातील विद्यालयांमध्ये सनातनचे ग्रंथ ठेवण्याचा निश्चित प्रयत्न करीन.’’ या वेळी सनातनच्या साधकांनी त्यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येण्याचे निमंत्रण दिले.

३. भ्रमणभाषसंच आणि इंटरनेट यांचा वापर करून पुढील पिढीला मार्गदर्शन करावे ! – खासदार शंकर लालवाणी, भाजप, इंदूर.

इंदूर येथील भाजपचे खासदार श्री. शंकर लालवाणी यांची भेट घेण्यात आली. या वेळी त्यांना बालसंस्काराशी संबंधित ग्रंथ दाखवण्यात आले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘दूरचित्रवाहिनी, भ्रमणभाषसंच आणि इंटरनेट यांच्या अतीवापरामुळे तरुण पिढीवर चुकीचा प्रभाव पडत आहे; परंतु या माध्यमांचा वापर करूनच आपल्याला पुढील पिढीला मार्गदर्शन करावे लागेल.’’ या वेळी त्यांना ‘बालसंस्कार ॲप’ची माहिती देण्यात आल्यावर त्यांनी त्याची ‘लिंक’ मागून घेतली.

४. भोपाळ येथील भाजपचे आमदार विष्णु खत्री यांची घेण्यात आली भेट !

भोपाळ येथील आमदार विष्णु खत्री (उजवीकडे) यांना ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ची माहिती देतांना श्री. अभय वर्तक

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी भोपाळ येथील भाजपचे आमदार श्री. विष्णु खत्री यांना ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ची माहिती विस्तृत दिली. या वेळी त्यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या शोधकार्याविषयी जिज्ञासेने जाणून घेतले. या प्रसंगी त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील १० विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेले ग्रंथ ठेवण्यास सहमती दाखवली.

५. भोपाळमधील भाजपच्या आमदार श्रीमती कृष्णा गौर यांची भेट !

उजवीकडून भोपाळच्या आमदार कृष्णा गौर यांच्यासमवेत भेटीनंतर सौ. संध्या आगरकर, सौ. शैला काळे, सौ. अंशू संत, श्री. अभय वर्तक आणि माजी नगरसेवक श्री. संजय वर्मा.

भोपाळमधील भाजपच्या आमदार श्रीमती कृष्णा गौर यांची सनातनचे साधक श्री. अभय वर्तक, सौ. संध्या आगरकर, सौ. शैला काळे, सौ. अंशू संत आणि भाजपचे माजी नगरसेवक श्री. संजय वर्मा यांनी भेट घेतली. या वेळी आमदार गौर यांनी सनातनच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी त्यांच्या भागातील तरुण पिढीला उपयुक्त असलेल्या सनातनच्या ग्रंथांचा संच ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. माजी नगरसेवक श्री. संजय वर्मा यांच्या प्रयत्नांनी आमदार गौर यांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले.

६. उज्जैन येथील भाजपचे आमदार पारस जैन यांची भेट !

उज्जैन येथील भाजपचे आमदार श्री. पारस जैन यांची भेट घेण्यात आली. या वेळी श्री. आनंद जाखोटिया आणि श्री. अभय वर्तक यांच्या समवेत श्री. संजय वाडकर अन् सौ. स्मिता कुलकर्णी उपस्थित होते. आमदार श्री. जैन यांनी सनातन संस्था करत असलेले धर्मकार्य जिज्ञासेने जाणून घेतले. त्यांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील विद्यालयांमध्ये ग्रंथ उपलब्ध करण्याची सहमती दर्शवली.

७. इंदूर येथील भाजपचे आमदार महेंद्र हार्डिया यांच्याशी भेट !

इंदूर येथील भाजपचे आमदार श्री. महेंद्र हार्डिया यांची सर्वश्री आनंद जाखोटिया आणि अभय वर्तक यांनी भेट घेतली. त्यांच्या समवेत सौ. पुष्पा सावंत आणि श्री. बेनीसिंह रघुवंशी उपस्थित होते.

८. या अभियानाच्या अंतर्गत इंदूरमधील भाजपचे आमदार रमेश मेंदोला, भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांचीही भेट घेण्यात आली.

९. तुम्ही अतिशय चांगले कार्य करत आहात ! – एकलव्य गौर, संस्थापक, हिंदुत्वरक्षक संघटना, इंदूर

इंदूर येथील ‘हिंदुत्वरक्षक संघटने’चे संस्थापक श्री. एकलव्य गौर यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या वेळी सर्वश्री अभय वर्तक, आनंद जाखोटिया, बेनीसिंह रघुवंशी, अथर्व सावंत आणि सौ. पुष्पा सावंत उपस्थित होते. या प्रसंगी श्री. एकलव्य गौड यांनी संस्थेकडून चालवण्यात येणार्‍या विविध उपक्रमांविषयी जाणून घेतले. या वेळी ते म्हणाले, ‘‘मी अनेक दिवसांपासून संस्थेचे उपक्रम सामाजिक माध्यमांद्वारे पहात आहे.  मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला निश्चित भेट देईन.’’


भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव श्री. कैलाश विजयवर्गीय यांची घेण्यात आली भेट !

डावीकडून श्री. आनंद जाखोटिया, श्री. अभय वर्तक आणि श्री. कैलाश विजयवर्गीय

इंदूर येथे सनातन संस्थेच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव श्री. कैलाश विजयवर्गीय यांची भेट घेऊन त्यांना ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ची माहिती देण्यात आली. तसेच त्यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून करण्यात येणार्‍या संशोधनाचीही माहिती देण्यात आली.

श्री. विजयवर्गीय यांनी स्वत:साठी सनातनच्या ग्रंथांचा एक संच खरेदी केला. त्यांना भावी पिढीवर संस्कार होण्याच्या दृष्टीने उपयुक्त ग्रंथ विद्यालयांमध्ये ठेवण्याच्या दृष्टीने विचारले असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.


उज्जैन आणि भोपाळ येथील विश्वविद्यालयांशी करण्यात आला संपर्क !

महर्षि पाणिनी संस्कृत आणि वैदिक विश्वविद्यालयाचे उपकुलपति प्रा. विजयकुमार सीजी यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाशी संबंधित संशोधनाची माहिती देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया (उजवीकडे)

या अभियानाच्या अंतर्गत उज्जैन येथील ‘महर्षि सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान’चे सचिव प्रा. विरुपाक्ष जड्डीपाल, ‘महर्षि पाणिनी संस्कृत आणि वैदिक विश्वविद्यालया’चे उपकुलपति प्रा. विजयकुमार सीजी आणि भोपाळच्या ‘अटलबिहारी वाजपेयी हिंदी विश्वविद्यालया’चे कुलपती श्री. खेमसिंह डेहरिया यांची भेट घेण्यात आली. या वेळी त्यांना ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ची आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन कार्याची  माहिती देण्यात आली. त्यांनी त्यांच्या विद्यालयांमध्ये ग्रंथ ठेवण्याची सिद्धता दर्शवली. याविषयी त्यांनी प्रसन्नता व्यक्त केली. या वेळी त्यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून अन्य भाषेच्या तुलनेत संस्कृतचा सूक्ष्म जगतावर होणारा परिणाम या विषयावर संशोधनाची माहिती देण्यात आली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *